दिल्ली मेट्रोकडून प्राथमिक अहवाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पूर्वसुसाध्यता (प्री फिजिब्लिटी रिपोर्ट) तयार करून घेण्यासाठी दिल्ली मेट्रो आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत दिल्ली मेट्रोने या प्रकल्पास तत्वत: मंजुरी दिली आहे.

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पूर्वसुसाध्यता (प्री फिजिब्लिटी रिपोर्ट) तयार करून घेण्यासाठी दिल्ली मेट्रो आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत दिल्ली मेट्रोने या प्रकल्पास तत्वत: मंजुरी दिली आहे.

कंपनीकडून यासंदर्भातील अहवाल प्राप्त झाल्यानंतर आठपैकी कोणत्या मार्गांवर हा प्रकल्प राबविणे शक्‍य आहे, ते ठरविण्यात येणार आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्याचा निर्णय पीएमआरडीएने यापूर्वीच घेतला आहे. त्यास राज्य सरकारनेही मान्यता दिली आहे. त्यापाठोपाठ आता आठ मार्गांवर हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला होता. त्यासाठी चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात पंधरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

पीएमआरडीएकडून मेट्रो प्रकल्पासाठी शहरातील आखणी आठ मार्ग प्रायोगिक तत्त्वावर निवडण्यात आले आहे. या मार्गांची पूर्वसुसाध्यता तपासणी करून त्यानंतर मार्ग निश्‍चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पूर्वसुसाध्यता तपासणीचे काम दिल्ली मेट्रोला देण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला होता. त्यानुसार गेल्या आठवड्यात पीएमआरडीचे आयुक्त किरण गित्ते आणि दिल्ली मेट्रोचे अधिकारी यांची या प्रकल्पासंदर्भात प्राथमिक बैठक झाली. त्यात दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या आठही मार्गांचा पूर्वसुसाध्यता अहवाल तयार करण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. लवकरच पुन्हा एक बैठक घेऊन हे काम दिल्ली मेट्रो या कंपनीला दिले जाणार आहे. दिल्ली मेट्रोकडून यासंदर्भातील अहवाल तयार झाल्यानंतर हे मार्ग निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यानंतर निश्‍चित केलेल्या मार्गांचा सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे.

सर्व मार्ग परस्परांना पूरक
पुणे महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या मार्गांना जोडणारे हे आठ मार्ग असणार आहे. याशिवाय हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गाला पूरक असे ते मार्ग असणार आहे. जेणेकरून शहरात मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभे राहण्यास मदत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

प्रस्तावित केले आठ मार्ग : 
शिवाजीनगर ते हडपसर 
वनाज ते हिंजवडी 
स्वारगेट ते खडकवासला 
चंदननगर - मगरपट्टा सिटी ते सोलापूर रस्ता 
चंदननगर ते वाघोली 
कोथरूड ते वर्षा पार्क( पाषाण) 
सिंहगड रोड ते कोथरूड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news primary report by delhi metro