‘ट्रान्सजेंडर’साठी संसदेत प्रस्ताव ठेवणार - सुळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

खडकवासला - ‘‘सरकारी व खासगी क्षेत्रांतील अर्जावर वैयक्तिक माहिती भरताना लिंग या रकान्यात स्त्री, पुरुष व इतर पर्याय असतात. आता या पुढे इतर ऐवजी ट्रान्सजेंडर (लिंग परिवर्धक म्हणजे तृतीय पंथी) असा पर्याय उपलब्ध होण्यासाठी कायदा करावा. याबाबत मी संसदेत प्रस्ताव ठेवणार आहे’’, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

खडकवासला - ‘‘सरकारी व खासगी क्षेत्रांतील अर्जावर वैयक्तिक माहिती भरताना लिंग या रकान्यात स्त्री, पुरुष व इतर पर्याय असतात. आता या पुढे इतर ऐवजी ट्रान्सजेंडर (लिंग परिवर्धक म्हणजे तृतीय पंथी) असा पर्याय उपलब्ध होण्यासाठी कायदा करावा. याबाबत मी संसदेत प्रस्ताव ठेवणार आहे’’, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा’ पुरस्कारांचे वितरण वडगाव बुद्रुक येथील सिंहगड इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये करण्यात आले. या वेळी सुळे बोलत होत्या. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व रचनात्मक काम करणाऱ्या युवक-युवतींचा या वेळी गौरव करण्यात आला.

क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोहम्मद नुबैरशेख (बुद्धिबळ) व किशोरी शिंदे (कबड्डी) यांना, तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सतीश सिडाम (ताडोबा वनक्षेत्रात आदिवासी हक्कासाठी कार्यरत) व कृपाली बिडये (हिजडा आणि ट्रान्सजेन्डर समूहासाठी कार्यरत) यांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ‘यशवंतराव चव्हाण विशेष युवा क्रीडा पुरस्कार’ हॉकीपटू आकाश चिकटे यांना प्रदान करण्यात आला. या वेळी ‘प्रथम’ सामाजिक संस्था व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा व स्त्री पुरुष समानता याविषयी जाणीव जागृती कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. संस्थेच्या फरिदा लांबे या वेळी उपस्थित होत्या. 

तलाकमधील शिक्षेऐवजी समुपदेशन करण्याची गरज
तिहेरी तलाकसंदर्भात पतीस तीन वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या शिक्षेमुळे मुलांच्या संगोपनावर परिणाम होईल. तसेच शिक्षा पूर्ण झाल्यावर तो पती त्या स्त्रीला स्वीकारणार नाही. त्यामुळे शिक्षेऐवजी समुपदेशन करण्यावर भर देणे आवश्‍यक असल्याचे सुळे यांनी सांगितले. 

Web Title: pune news proposal in parliament for transgender