पडलेले झाड हटविले; कचरा-चिखल "जैसे थे' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे - पावसामुळे रस्त्याच्या मध्यभागी पडलेले झाड काढावे, यासाठी नागरिकांकडून सात दिवस पाठपुरावा केल्यानंतरही कॅंटोन्मेंट प्रशासनाला जाग येत नसल्याची सद्य-स्थिती आहे. सात दिवसांनी झाडाच्या मोठ्या फांद्या काढल्या, परंतु कचरा, चिखल, पाणी काढण्याचे कष्ट कॅंटोन्मेंट प्रशासनाने घेतले नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. तरीही कॅंटोन्मेंटच्या अधिकाऱ्यांची एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरूच आहे. 

काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे कॅंटोन्मेंटच्या अन्य भागाप्रमाणेच बिशप स्कूलजवळील चौकाकडून कमांड रुग्णालय आणि कृत्रिम अवयव प्रत्यारोपण केंद्राजवळील रस्त्यावरही मोठे झाड पडले. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला. हा प्रकार पाहून दिनेश कंट्रोलू या नागरिकाने हे झाड काढावे, यासाठी महापालिकेचा अग्निशामक विभाग, कॅंटोन्मेंटचा अग्निशामक विभाग, उद्यान विभाग यांच्याशी संपर्क केला. परंतु त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे मिळाली. कंट्रोलू म्हणाले, ""कॅंटोन्मेंटने माझ्या तक्रारीनंतर सातव्या दिवशी झाडाच्या मोठ्या फांद्या काढल्या; परंतु तेथे कचरा, चिखल, पाणी अजूनही आहे. त्यावरून वाहने घसरून एखाद्याचा जीव जाऊ शकतो.'' 

याविषयी उद्यान विभागाचे अधीक्षक जयंत कांगणे म्हणाले, ""याप्रकरणी माझ्याकडे तक्रार आलेली नाही. मात्र संबंधित भाग लष्कराच्या मालमत्ता विभागाच्या अखत्यारीत येतो. लष्करी भागामुळे तेथे काम करण्यास अडचणी येतात. तरीही आम्ही झाड हटविले आहे. मात्र कचरा, चिखल व पाणी काढण्याचे काम आरोग्य विभागाचे आहे.'' आरोग्य विभागाचे अधीक्षक संजय झेंडे म्हणाले, ""झाड पडलेल्या ठिकाणाची पाहणी करू. लवकरच तेथे स्वच्छता करू.'' लष्कराच्या मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. 

Web Title: pune news pune cantoment board