पुणे फेस्टिव्हलचे जल्लोषात उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पुणे  - अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने "शीला की जवानी' या गाजलेल्या "आयटम सॉंग'वर खास मराठमोळ्या ठसक्‍यात सादर केलेली लावणी... त्याला असणारी शर्वरी जेमिनीस आणि मृण्मयी देशपांडे यांच्या गणेशवंदनेची साथ... त्यासोबतच "शॉटगन' शत्रुघ्न सिन्हा यांनी उपस्थितांना "खामोश' करत केलेले भाषण... अशा वातावरणात 29 व्या पुणे फेस्टिव्हलचे शुक्रवारी उद्‌घाटन झाले. 

फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, दिग्दर्शक सुभाष घई, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी दिग्दर्शक सुमित्रा भावे, ऍनिमेशन तज्ज्ञ आनंद खांडेकर आणि अभिनेते शेखर सुमन यांचा "पुणे फेस्टिवल' सन्मानाने गौरविण्यात आले. 

पुणे फेस्टिव्हलला पुढील वर्षी सरकारकडून 30 लाख रुपये निधी देण्यात येईल, अशी घोषणा रावल यांनी केली. या सोहळ्यात नृत्यांसोबतच पारंपरिक पोवाडा सादर करण्यात आला. शिवाय, मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. 

दरम्यान, आपल्या भाषणात शेखर सुमन यांनी बाबा रामरहीम प्रकरणात समाजात पसरलेल्या भोंदू "बाबा-बुवां'च्या संस्कृती वर टीका केली. लोकांनी अशा चुकीच्या गोष्टींकडे डोळे उघडे ठेवून पाहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: pune news pune festival