‘पुणे फेस्टिव्हल’मध्ये कलाविष्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पुणे - संगीत, नृत्य, गायन, वादन अशा विविध कलांचा आविष्कार असणाऱ्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे यंदाचे २९ वे वर्ष असून हा महोत्सव २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन दिग्दर्शक सुभाष घई, खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे. या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अभिनेत्री नेहा शर्मा, अभिनेते विवेक ओबेरॉय, कार्तिक आर्यन उपस्थित राहणार आहेत.

पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरिक, केंद्र सरकारचा पर्यटन विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हा महोत्सव आयोजिला आहे. ‘पुणे फेस्टिव्हल’अंतर्गत विविध कार्यक्रमांची आणि पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी फेस्टिव्हलचे अध्यक्ष आणि माजी खासदार सुरेश कलमाडी, मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, डॉ. सतीश देसाई आदी उपस्थित होते.

महोत्सवात ऑल इंडिया उर्दू मुशायरा, उगवते तारे, इंद्रधनू, शास्त्रीय संगीत-नृत्य, मराठी कवी संमेलन, महिला महोत्सव, चित्रकला प्रदर्शन, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, केरळ महोत्सव, मराठी नाट्यप्रयोग अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. पुणे फेस्टिव्हलमधील ‘श्रीं’च्या मूर्तीची प्रतिष्ठापना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी होणार आहे. या महोत्सवांतर्गत गोल्फ, मल्लखांब, कुस्ती अशा विविध क्रीडा स्पर्धा होणार आहेत. महोत्सवातील सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुले आहेत.

प्रतीक्षा २०१९ च्या निवडणुकीची - कलमाडी
महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीबाबत तुम्ही समाधानी आहात का, असा प्रश्‍न सुरेश कलमाडी यांना विचारला असता, ‘मी समाधानी’ अशा दोन शब्दांत त्यांनी उत्तर देत पुढे बोलणे टाळले. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात कोणी केली, यावरील वादाबाबत विचारले असता, ‘आम्ही गणेशोत्सवादरम्यान पुणे फेस्टिव्हल आयोजित करतो, आम्हाला कोणत्याही वादात पडायचे नाही’, असे उत्तर त्यांनी दिले. काँग्रेस पक्षाची कामगिरी आणि राजकीय घडामोडींबाबत प्रश्‍नावरही बोलणे टाळत, मी हल्ली राजकारणापासून दूर असल्याचे सांगताना २०१९ च्या निवडणुकीची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: pune news pune festival suresh kalmadi