पुणे-लोणावळा ट्रॅकला वादाचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

पुणे - पुणे-लोणावळादरम्यान तिसरा आणि चौथा ट्रॅक टाकण्याचे काम अद्याप सर्वेक्षणातच अडकले आहे. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हे काम पूर्ण होण्यास आणखी एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, निधी देण्यावरूनही वाद निर्माण झाला असून, त्यावर तोडगा काढणे आवश्‍यक आहे.

पुणे - पुणे-लोणावळादरम्यान तिसरा आणि चौथा ट्रॅक टाकण्याचे काम अद्याप सर्वेक्षणातच अडकले आहे. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हे काम पूर्ण होण्यास आणखी एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, निधी देण्यावरूनही वाद निर्माण झाला असून, त्यावर तोडगा काढणे आवश्‍यक आहे.

पुणे-लोणावळादरम्यान सध्या रेल्वेचे दोनच ट्रॅक आहेत. प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने आणखी एक ट्रॅक वाढविण्याचा निर्णय घेतला होता. हे काम मुंबई रेल कॉर्पोरेशनला दिले होते. त्यांच्याकडून हे काम जवळपास पूर्ण झाले होते; मात्र भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रशासनाने आणखी एक ट्रॅक टाकावा यावा, असा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वेक्षण नव्याने करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार चौथ्या ट्रॅकचेही सर्वेक्षण सुरू असून, हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक वर्ष लागेल, असे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

तिसरा व चौथा ट्रॅक कधी?
‘पीएमआरडीए’ने निधी देण्यास मान्यता दिली आहे; मात्र पुणे महापालिकेने हा निधी देण्यास नकार दिला असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेची या संदर्भातील भूमिका स्पष्ट नाही. परिणामी निधी सरकार देणार की या दोन्ही महापालिकांना तो द्यायला भाग पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व गोष्टींमुळे पुणे-लोणावळादरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम रेंगाळलेले आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

निधी देण्यावरून वाद
या कामासाठी येणाऱ्या खर्चापोटी पन्नास टक्के केंद्र, तर पन्नास टक्के राज्य सरकार खर्च करणार आहे. त्यानुसार केंद्र सरकारने निधी मंजूर केला; मात्र या कामासाठीचा उर्वरित निधी म्हणजे राज्य सरकारच्या हिश्‍शाची रक्कम दोन्ही महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) द्यावी, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली.

चाळीस वर्षे चर्चेची
पुणे विभाग हा १९९६ मध्ये अस्तित्वात आला. पूर्वी हा भाग मुंबई विभागाच्या अंतर्गत होता. तेव्हापासून (१९७८) पुणे-लोणावळा तिसरा ट्रॅक टाकण्याचे नियोजन होते. अद्याप ते पूर्ण झालेले नाही.

Web Title: pune news pune-lonavala track dispute