'स्थायी'च्या अध्यक्षपदी योगेश मुळीक

अनिल सावळे
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आज (शनिवार) भारतीय जनता पक्षाकडून योगेश मुळीक यांनी अर्ज दाखल केला.  महापालिकेत भाजपची सत्ता असून, त्यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे "स्थायी'च्या अध्यक्षपदी मुळीक यांची निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या बुधवारी (ता. 7) अध्यक्षाची निवड असून, त्यादिवशी अधिकृत घोषणा करण्यात येईल. दरम्यान, या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षातही घराणेशाहीला महत्त्व देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेतील स्थायी समितीच्या तब्बल पावणेसहा हजार कोटी रुपयांच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू होती. "स्थायी'चे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी संपत आहे. त्यामुळे "स्थायी' च्या नवीन अध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून, आज उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. अध्यक्ष निवडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घराणेशाहीला संधी देणार, की राजकीय आणि भौगोलिक समतोल साधण्यासाठी नव्या चेहऱ्याला संधी देणार याकडे अनेकांचे लक्ष लागून होते.

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे भाऊ सुनील कांबळे, आमदार जगदीश मुळीक यांचे भाऊ योगेश मुळीक आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या मातु:श्री रंजना टिळेकर यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. मुख्यमंत्री यापैकीच एकाच्या पारड्यात अध्यक्षपदाची माळ टाकतील, अशी चर्चा होती.

Web Title: pune news pune municipal corporation standing committee yogesh mulik