पुणे-शिरुर महामार्ग कामाला पुन्हा खो...

निलेश कांकरिया
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

वाघोली (पुणे): प्रस्तावित पुणे ते शिरुर महामार्ग रुंदीकरण व उड्डाणपुल प्रकल्प कामाला पुन्हा खो बसला आहे. पुणे ते नगर व नगर ते औरंगाबाद या महामार्गाचा समावेश केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेत समावेश करण्यात आल्याने राज्य सरकारने पुणे ते शिरुर या कामाचा प्रस्ताव रद्द केला असल्याचे समजते.

वाघोली (पुणे): प्रस्तावित पुणे ते शिरुर महामार्ग रुंदीकरण व उड्डाणपुल प्रकल्प कामाला पुन्हा खो बसला आहे. पुणे ते नगर व नगर ते औरंगाबाद या महामार्गाचा समावेश केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेत समावेश करण्यात आल्याने राज्य सरकारने पुणे ते शिरुर या कामाचा प्रस्ताव रद्द केला असल्याचे समजते.

पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी, अरुंद महामार्ग, वाहनांची वाढलेली संख्या या बाबींचा विचार करता राज्य सरकारने पुणे ते शिरुर दरम्यान सहा पदरी रुंदीकरण व उड्डाणपूल प्रकल्पाला मंजुरी दिली हेाती. सरकारच्या हायब्रीड इन्युइटी योजने अंतर्गत हे काम करण्यात येणार होते. यासाठी 462 केाटी रुपायांचा निधीही मंजूर झाला हेाता. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभागाने सर्वेक्षण करुन प्रकल्प अहवाल तयार केला हेाता. त्याची निवीदा नेाव्हेंबर 2017 अखेर प्रसिध्द होऊन जानेवारी मध्ये काम सुरु करण्याचा मानस होता. मात्र, काही महिन्यापुर्वी केंद्र सरकारने भारतमाला प्रकल्प जाहीर केला. यामध्ये पुणे ते नगर व नगर ते औरंगाबाद या महामार्गाचा समावेश करण्यात आला. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले. हा महामार्ग केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेत समाविष्ट झाल्याने राज्य सरकारने प्रस्तावित पुणे ते शिरुर या 53 किलोमीटर रस्त्याच्या कामाचा प्रकल्प रद्द केला आहे. तसे पत्र सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाला प्राप्त झाल्याचे समजते.

काय आहे भारतमाला येाजना
देशाच्या पुर्वेपासुन ते पश्चिमेपर्यंत म्हणजे मिझेारामपासुन ते गुजरातच्या सीमाभिंतीपर्यंत रस्ता बांधण्याची महत्वकांक्षी योजना केंद्र सरकारने आखली असून या योजनेला भारतमाला असे नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत 5300 किलोमीटरचा रस्ता बांधला जाणार आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र व किनारपट्टीवरील राज्यांना एका रस्त्याच्या जाळयाने जेाडला जाणार असून पाच वर्षात पुर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील पाच रस्त्यांचा समावेश आहे. त्यामध्ये पुणे ते नगर व नगर ते औरंगाबाद रस्त्याचा समावेश आहे.

पुणे ते औरंगाबाद या महामार्गाचा समावेश केंद्र सरकारच्या भारतमाला प्रकल्प अंतर्गत झाला असला तरी पुणे ते शिरुर महामार्ग रुंदीकरण व उड्डाणपुल प्रकल्प राज्य सरकारच्या हायब्रीड इन्युइटी येाजने अंतर्गत व्हावा यासाठी पाठपुरवठा करणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी त्या अंतर्गतच काम करणार असल्याचे आश्वासन दिले आहे."
- आमदार बाबुराव पाचर्णे.

'या महामार्गाचे काम भारतमाला की राज्य सरकारच्या हायब्रीड इन्युइटी योजने अंतर्गत करायचे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.'
- राजेंद्र रहाणे, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभाग.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news pune nagar highway canceled