पुण्याची दिल्ली नको!

वाहने म्हणजे कार्बनची धुराडीच...!!
वाहने म्हणजे कार्बनची धुराडीच...!!

वाहने म्हणजे कार्बनची धुराडीच...!!

पुणे: शहरात होणाऱ्या एकूण प्रदूषणात वाहनांकडून होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण अठरा टक्के असून कार्बन डायऑक्‍साईडच्या उत्सर्जनापैकी तब्बल 84 टक्के उत्सर्जन हे वाहनांमुळे होते. खासगी वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा वाटा कमी असला तरी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिल्यास प्रदूषणाबरोबरच वाहतूक कोंडी, अपघात आणि मानसिक तणावही कमी होतो. त्यामुळेच सार्वजनिक वाहतुकीची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दिल्ली परिसरात होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तेथील राज्य सरकारने "सम-विषम'चा प्रयोग राबविला होता. या प्रयोगांतर्गत दररोज फक्त सम किंवा विषम क्रमांकाच्याच वाहनांना रस्त्यावर येण्यास परवानगी होती. रस्त्यावर धावणाऱ्या खासगी वाहनांची संख्या कमी झाल्यास प्रदूषण पातळीत लक्षणीय घट होईल, असा ढोबळ अंदाज राज्यकर्ते आणि सामान्य नागरिकांना होता. मात्र, प्रत्यक्षात तसे काही घडलेच नाही. खासगी वाहनांवर मर्यादा घालूनही प्रदूषण घटले नाही. याचे कारण तेथील प्रदूषणामागे वाहतुकीपेक्षाही आणखी अनेक गंभीर कारणे होती.

कार्बन डायऑक्‍साईडच्या सर्वाधिक उत्सर्जनाला कारणीभूत ठरतात वाहने. मात्र या वाहनांमध्ये पन्नास टक्‍क्‍याहून अधिक वाटा हा ट्रक व अन्य जड वाहनांचा आहे. गेल्या काही वर्षात पीएमपी बस आणि रिक्षा "सीएनजी'वर चालत असल्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसला आहे. दुचाकींमुळे "पीएम-10'चे 65 टक्के प्रदूषण होत असल्याचेही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पूर्वीच्या एका पाहणीत आढळले होते.

प्रदूषणाला कारणीभूत घटक आणि प्रमाण
कार्बन डायऑक्‍साईड
वाहने - 84 टक्के
अन्य - 16 टक्के

पीएम 10
रस्त्यावरची धूळ - 60.7 टक्के
अन्य - 19.8 टक्के
वाहने - 18.2 टक्के
उद्योग - 1.2 टक्के

या उपाययोजना आवश्‍यक
- पंधरा वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवर बंदीची प्रभावी अंमलबजावणी
- वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नलचे सुसूत्रीकरण
- "रिंगरोड'द्वारे शहरांतर्गत जड वाहतुकीला लगाम घालणे
- इलेक्‍ट्रिक वाहनांना प्रोत्साहन
- चांगल्या दर्जाच्या इंधनाचा वापर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com