रेल्वे स्टेशनच्या भिंतींवर अवतरले प्राणी, पक्षी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

पुणे - पुणे विभागातील वनांमध्ये आढळणारे जंगलातील विविध प्राणी व पक्षी पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अवतरले आहेत. या जैवविविधतेचे दर्शन चित्ररूपाने आता रेल्वे स्टेशनच्या भिंतीवर साकारण्यात आली आहे. एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, अभिनेते जॅकी श्रॉफ, खासदार अनिल शिरोळे यांच्यासोबत प्रवाशांनी रविवारी ही चित्रे पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

मध्ये रेल्वेचा पुणे विभाग, पुणे वन विभाग आणि नेचर वॉक यांच्या वतीने पुणे वन्यजीव विभागातील मयूरेश्वर अभयारण्य, सुपे, भीमाशंकर अभयारण्य, नान्नज, रेहेकुरी अभयारण्यातील जैवविविधतेवर आधारित चित्र काढण्यात आली आहेत. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर चारशे मीटर भिंतीवर सीताराम घारे व देविदास कासेकर यांनी ही चित्रे साकारली आहेत. खासदार अनिल शिरोळे यांनी डिजिटल पद्धतीने या प्रकल्पाचे औपचारिक उद्‌घाटन केले. रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय, पुण्याचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, मुख्य वन्यजीव संरक्षक के. पी. सिंग यांच्यासह वन विभागाचे अन्य अधिकारी व नेचर वॉकचे अनुज खरे या वेळी उपस्थित होते. 

""आपण पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. झाडे लावली पाहिजेत. त्यांचे संवर्धन केले पाहिजे. त्या माध्यमातून वन्यजीवांचे रक्षण होण्यास मदत होणार आहे,'' असे श्रॉफ म्हणाले. ""सामाजिक उद्देशाने कार्य करणाऱ्या संस्थांनी एकत्रितपणे असे उपक्रम राबविले पाहिजेत. दत्तक गाव योजनेतील तीन गावांमध्येही हा उपक्रम राबविणार असल्याचे शिरोळे यांनी या वेळी सांगितले. 

""स्वच्छतेसाठी आपल्याकडे ठिकठिकाणी देवाचे फोटो लावण्यात येतात. तसेच या ठिकाणी थुंकू नये असेही फलक लावलेले असतात. मात्र त्याचा काही फरक पडत नाही, असे दिसून येते. त्यामुळे आता "या ठिकाणी थुंकावे' असे फलक लावून पाहण्याची वेळ आली आहे,'' असे मत भूषण गोखले यांनी व्यक्त केले.

Web Title: pune news pune railway station