रेल्वेकडून विजेची बचत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

पुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विविध ठिकाणी बसविलेले एलईडी दिवे, सौरऊर्जा प्रकल्प आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांमुळे १४ लाख ५४ हजार युनिट विजेची बचत झाली आहे. 

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. रेल्वे फाटक, तिकीट आरक्षण कार्यालय तसेच कोल्हापूर, मिरज आणि घोरपडी येथे असणाऱ्या रनिंग रूममध्ये सोलर वॉटर हिटर लावण्यात आले आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विजेची बचत होत आहे. 

‘सीएसआर’च्या माध्यमातून पुणे स्थानकावर १६० केव्ही; तर दौंड स्थानकावर १० केव्ही क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. याद्वारे निर्माण होणाऱ्या सौर ऊर्जेवर स्थानकावरील लाईट्‌स, पंखे आदी उपकरणे चालविली जातात.  दरम्यान, पुणे विभागाने वीज बचतीसाठी एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीबरोबर करार केला आहे. त्यानुसार विभागातील सर्व स्थानके आणि कार्यालयातील लाईट्‌स, पंखे, एसी, इतर उपकरणे बदलून ती सौर ऊर्जेवर चालणारी बसविण्यात येणार आहेत. यातून वर्षाला ७ लाख ३१ हजार युनिटची बचत होऊन विभागाला ६१ लाख ३५ हजारांचा फायदा होईल.

पुणे विभागात सौरऊर्जेविषयी महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जाणार असून या अंतर्गत वेगवेगळ्या स्थानकांवर १.२ एमडब्ल्यूपी क्षमतेची सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात येईल. या माध्यमातून दरवर्षी १७ लाख ७२ हजार युनिट विजेची बचत होऊन विभागाला १ कोटी ४७ लाखांचा फायदा होणार आहे.
- मिलिंद देऊस्कर, मुख्य व्यवस्थापक, रेल्वे पुणे विभाग

Web Title: pune news pune railway station electricity