पर्यावरणपूरक गणेशोत्सव अधिक गतिमान करणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पुणे - गणेश विसर्जनावेळी विद्यार्थ्यांनी धार्मिक हस्तक्षेप करू नये. नदी प्रदूषण प्रतिबंध, पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम राबविताना धार्मिक भावना न दुखावता नागरिकांकडून सौजन्यपूर्वक गणेशमूर्ती घ्यावी, अशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची भूमिका आहे. यापुढेही पर्यावरणपूरक गणेशोत्सवात विद्यार्थ्यांचा सहभाग कायम राहील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

पुणे - गणेश विसर्जनावेळी विद्यार्थ्यांनी धार्मिक हस्तक्षेप करू नये. नदी प्रदूषण प्रतिबंध, पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम राबविताना धार्मिक भावना न दुखावता नागरिकांकडून सौजन्यपूर्वक गणेशमूर्ती घ्यावी, अशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची भूमिका आहे. यापुढेही पर्यावरणपूरक गणेशोत्सवात विद्यार्थ्यांचा सहभाग कायम राहील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

विद्यापीठाने विद्यार्थांना गणेशमूर्ती दान घेण्यापासून रोखण्याचे परिपत्रक जारी केल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवर आल्याने विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाने त्यावर खुलासा केला आहे. मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले, ""विद्यापीठाची भूमिका ही नेहमीच पर्यावरणपूरक राहिली आहे. संबंधित परिपत्रक विद्यापीठाचे नाही, तर सहसंचालक, (उच्च शिक्षण विभाग) यांनी पाठवलेले आहे. त्यांच्या सूचनेनुसार ते पुढे पाठवण्याचे काम विद्यापीठाने केले आहे. त्यामुळे विद्यापीठाने पर्यावरणपूरक भूमिकेशी कोणतीही फारकत घेतलेली नाही.'' 

""विद्यापीठ समाज परिवर्तन व प्रबोधनाच्या चळवळीचे केंद्र आहे आणि पुढेही राहील. पर्यावरणपूरक गणेशोत्सवात विद्यार्थी सहभागी होतीलच. कोणत्याही धर्माच्या, समूहाच्या भावना विद्यार्थ्यांकडून तीव्रतेने दुखावल्या जाऊ नयेत, याचा अर्थ गणेशमूर्ती सौजन्याने व प्रबोधनात्मक पद्धतीने स्वीकारावी. लोकांचे अत्यंत नम्रतेने प्रबोधन करावे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना शास्त्रीय पद्धतीने मांडावी. मूर्तीचे विसर्जन केल्यावरही मूर्ती ताब्यात घेताना तिचा अनादर वा हेळसांड होणार नाही, याची काळजी घ्यावी, एवढाच विद्यापीठाच्या या परिपत्रकाचा मतितार्थ आहे,'' असे डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले. 

विद्यार्थ्यांना सामाजिक परिवर्तनापासून बाजूला काढणे, असा कोणताही हेतू नाही. उलट अधिक गतीने विद्यार्थी विधायक व सामाजिक अभिसरणात सहभागी होतील. प्रबोधनाचा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा उपक्रम यापुढे असाच कायम व गतिमान राहील. 
- डॉ. प्रभाकर देसाई, संचालक, विद्यार्थी विकास मंडळ 

उच्च शिक्षण विभागाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला विरोध नाही. त्यापासून विद्यार्थ्यांना रोखलेले नाही. तसा कोणताही आदेश विद्यापीठाला दिलेला नव्हता. विद्यापीठाने हिंदू जनजागृतीचे परिपत्रक तपासून कार्यवाही करावी, असे पत्र आम्ही पाठविले होते. विद्यार्थ्यांना कोणत्या उपक्रमात सहभागी करावे, हा निर्णय विद्यापीठाने घ्यायचा असतो. त्याचा उच्च शिक्षण संचालनालयाशी संबंध येत नाही. 
- डॉ. विजय नारखेडे, उच्च शिक्षण संचालक 

Web Title: pune news pune university