केपीआयटी स्पर्धेत पुण्यातील विद्यार्थी यशस्वी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

पुणे - केपीआयटी टेक्‍नोलॉजी या उत्पादन, अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान सल्लागार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जागतिक दर्जाच्या टेक्‍नॉलॉजी कंपनीच्या वतीने केपीआयटी स्पार्कल या स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. 

पुणे - केपीआयटी टेक्‍नोलॉजी या उत्पादन, अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान सल्लागार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जागतिक दर्जाच्या टेक्‍नॉलॉजी कंपनीच्या वतीने केपीआयटी स्पार्कल या स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. 

नव्या साधनांचा वापर करून, तेलमिश्रण झालेल्या पाण्याला पिण्यायोग्य करेपर्यंत गाळण्याच्या योग्यतेची उपाययोजना विकसित केल्याबद्दल पुणे विद्यार्थिगृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयतील टीम नॅनोनॉक्‍स तर स्वयंपाकघरातील किचन स्टोव्हमधून निर्माण होणारी ऊर्जा थर्मोइलेक्‍ट्रिक मोड्यूल्सचा वापर करून विजेमध्ये परावर्तीत करणारी उपाययोजना विकसित केल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील टीम थर्मो आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संघाना प्रत्येकी एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. मंगलोर येथील सह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या टीम स्मार्टगिअरला स्मार्ट हेल्मेट विकसित केल्याबद्दल सुवर्ण पारितोषिक मिळाले. 

केपीआयटीचे सहसंस्थापक रवी पंडित म्हणाले, "स्पार्कलमध्ये दर वर्षी कल्पकता आणि नवशोधांच्या बाबतीत नवनवे मापदंड कायम करण्यात येत आहेत. ऊर्जा आणि दळणवळण क्षेत्रात स्पर्धकांकडून मिळणाऱ्या संकल्पनांमध्ये या क्षेत्रांत देशात परिवर्तन घडवून आणण्याची प्रचंड क्षमता आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि पर्यावरणस्नेही, हरित व इंटेलिजंट तंत्रज्ञान असलेली स्मार्ट शहरे विकसित करणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर "स्पार्कलच्या माध्यमातून आम्ही उदयोन्मुख संशोधकांना त्यांच्या कल्पना उत्पादनांमध्ये परावर्तीत करण्यासाठी इन्क्‍युबेशन सेंटर्स उपलब्ध करून देऊ.' त्याचप्रमाणे काही आश्वासक कल्पनांना विकसित करण्याचा विचारदेखील असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

Web Title: pune news Pune University in KPIT Tournament