'विद्यापिठाला मिळालेल्या स्वायत्तेमुळे ज्येष्ठांना पीएचडीचा मार्ग खुला'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ, ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षातर्फे संत नामदेव सभागृहामध्ये तिसरे ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे. संमेलनाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.नवनाथ तुपे, आर. टी. वझेकर उपस्थित होते.

पुणे : "ज्येष्ठ नागरीकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पुर्वी पीएचडी करता येत होती. मात्र काही तांत्रिक कारणामुळे काही वर्षापासून हा विषय थांबला होता. मात्र विद्यापिठाला मिळालेल्या स्वायत्तेमुळे ज्येष्ठाना पीएचडीचा मार्ग आता खुला होऊ शकतो. ज्येष्ठाकडील अनुभवाची समृद्ध शिदोरी पुणे विद्यापीठाला हवी आहे." असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा डॉ. नितीन करमळकर यांनी रविवारी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ, ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षातर्फे संत नामदेव सभागृहामध्ये तिसरे ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे. संमेलनाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.नवनाथ तुपे, आर. टी. वझेकर उपस्थित होते.        

देशमुख म्हणाले, "ज्येष्ठ नागरिक हे व्यासंगी असतात. म्हणुनच त्यांच्याकडील अनुभव व माहितीचा साठा त्यांनी विकिपीडिया सारख्या महत्वाच्या ठिकाणी टाकल्यास नव्या पिढ़ीला त्याचा चांगला फायदा होईल. त्यासाठी आवश्यक मदत आम्ही करु."

ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलनाची वैशिष्ट-तीनशेहून अधिक ज्येष्ठाचा सहभाग, पुणे व पिंपरी-चिंचवड परीसरातील नागरिक सहभागी, व्याख्याने, परीसंवाद, काव्य संमेलनात ज्येष्ठ नागरीकांचा सहभाग, नामवंत साहित्यिक, कवीचा ही सहभाग.

Web Title: Pune news Pune university senior citizens phd