पाच वर्षांनंतर मिळणार विद्यापीठाला प्र-कुलगुरू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सुमारे पाच वर्षांनंतर प्र-कुलगुरू मिळणार आहेत. त्यासाठी तीन जणांची नावे कुलगुरूंनी राज्यपालांकडे पाठविली आहेत. गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी आणि विद्यापीठातील विधी विभागातील प्राध्यापक डॉ. दिलीप उके यांची नावे चर्चेत आहेत. सोमवारी नव्या प्र-कुलगुरूची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. 

नव्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार आता प्र-कुलगुरू हे पदावरील नियुक्ती सक्तीची करण्यात आली आहे. यापूर्वी तशी सक्ती नव्हती. त्यामुळे आधीच्या कुलगुरूंनी प्र-कुलगुरूपदी कुणाचीही नियुक्ती केलेली नव्हती. ही नियुक्ती केल्यास विद्यापीठात दोन सत्तास्थाने तयार होऊ नयेत म्हणून प्र-कुलगुरूंची नियुक्ती होत नसल्याची टीकादेखील त्या वेळी करण्यात येत होती. 

विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी प्र-कुलगुरूपदावर नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. नव्या कायद्यानुसार या पदासाठी राज्यपालांना नावे सूचविण्याचा अधिकार कुलगुरूंना देण्यात आला. त्यानुसार डॉ. करमळकर यांनी चार नावे राज्यपालांना पाठविली आहेत. त्यात डॉ. उमराणी आणि डॉ. उके यांचा समावेश असल्याने विद्यापीठातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. अन्य एका प्राचार्यांचे नाव समजू शकलेले नाही. मात्र, ते एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य असल्याचे समजले. 

Web Title: pune news pune university Vice-Chancellor