शेतकऱयांना आर्थिक पाठबळासाठी शेतीउपयोगी वस्तू दिल्या जाणार

युनूस तांबोळी
सोमवार, 17 जुलै 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे) शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावी यासाठी जिल्हा परीषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम नेहमीच राबविले जातात. पुर्वी 50 ट्क्के अनुदानावर वस्तू दिल्या जात होत्या. यानंतर 75 टक्के अनुदानावर शेतीउपयोगी वस्तू दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परीषद पशुसंवर्धन समितीच्या सदस्या व जिल्हा परीषद सदस्या सवीता बगाटे यांनी दिली.

टाकळी हाजी येथे मुक्त संचार गोठ्याला भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी भिमाशाकंर कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे, राष्ट्रवादी युवक कॅाग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर, सरपंच दामुशेठ घोडे, बाबाजी साबळे, बाळासाहेब खटाटे, फकीरा घोडे आदी उपस्थीत होते.

बगाटे म्हणाल्या की, जिल्हा परीषदेच्या माध्यमातून लवकरच मिल्गिंग मशीन, गव्हाण जाळी, कटबा कुट्टी, ट्राली आदी वस्तू दिल्या जाणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. मैत्रीण योजनेचा लाभ घेत असताना व्यैयक्तिक लाभाच्या वस्तूची माहिती करून घ्यावी.

प्रदीप वळसे पाटील म्हणाले की, सर्व सामान्य शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करून शेती पूरक उद्योग सुरू करता येत नाहित. दुग्ध व्यवसायाला पाठबळ मिळण्यासाठी जिल्हा परीषदेच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम सुरू व्हावेत. त्यातून लहान शेतकऱ्यांना पाठबळ मिळून दुग्ध व्यवसायाची भरभराटी होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी अद्ययावत कुकटपालनाच्या व्यवसायाकडे वळावे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: pune news pune zilla parishad and farmer