‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरासाठी पुणेकर सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

पुणे - आषाढीवारीनिमित्त दरवर्षी पंढरीला संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या प्रस्थान ठेवतात. देहू आणि आळंदीला वारकऱ्यांची मांदियाळी जमली असून, पुण्यातही पालख्यांच्या आगमनाप्रीत्यर्थ जय्यत तयारी सुरू आहे. भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर आणि नाना पेठेतील निवडुंगा विठोबा देवस्थान येथे पालख्या मुक्कामी येणार असल्याने पालखीच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर येथे मुक्कामी येते. तर संत तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा देवस्थानच्या मंदिरात मुक्कामी येते. रविवारी (ता. १८) या दोन्ही पालख्या मुक्कामी येणार आहेत. दोन्ही मंदिरांच्या बाहेर महापालिकेतर्फे मांडव उभारण्यात आले आहेत. भाविकांच्या सोयीकरिता दरवर्षी दर्शनबारीही उभारण्यात येते. महापालिका प्रशासनाने परिसराची पाहणी करून तेथे औषध फवारणी केली. तसेच आसपासचा परिसरही स्वच्छ करण्यात येत आहे.  

भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे म्हणाले, ‘‘वारीनिमित्त मंदिरात रंगरंगोटी करण्यात आली. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात तेरा कॅमेरे बसविण्यात आले असून, आणखीन सात कॅमेरे बसविणार आहोत. वारकऱ्यांचे भोजन, न्याहारीची व्यवस्थाही ट्रस्टतर्फे करण्यात येते. भाविकांच्या सोईसाठी मंदिराबाहेर पालिकेने आठ हजार चौरस फुटांचा मांडव उभारला आहे.’’

नाना पेठेतील निवडुंगा विठोबा देवस्थानचे व्यवस्थापक आनंद पाध्ये म्हणाले, ‘‘मंदिरात सुरक्षिततेच्या दृष्टीने सहा कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. देवस्थानतर्फे वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते.’’

Web Title: pune news punekar ready for dnyanoba tukaram palkhi