पुरंदर विमानतळासाठी लागणार १४ हजार कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

पुणे - ‘‘पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे चौदा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे विमानतळ पीपीपी (खासगी व सार्वजनिक भागीदारी पद्धतीने) मॉडेल नुसार उभारण्यात येणार असून, विमानतळाचा ‘सर्वंकष प्रकल्प आराखडा’ (डीपीआर) डार्स या कंपनीकडून सादर झाल्यानंतर त्यामध्ये अधिक स्पष्टता येईल,’’ असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

विमानतळाचा डीपीआर तयार करण्याचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाकडून जर्मन येथील डार्स कंपनीला यापूर्वीच देण्यात आले आहे. मात्र संरक्षण खात्याची मंजुरी मिळाली नसल्यामुळे कंपनीकडून सर्वेक्षणाचे काम धीम्यागतीने सुरू होते.  दोन दिवसांपूर्वी संरक्षण खात्याने याला हिरवा कंदील दाखविला असून, विमानतळाच्या मार्गातील सर्वांत मोठी अडचण दूर झाली आहे. त्यानंतर महामंडळाने डीपीआरसाठी आवश्‍यक सर्व्हेक्षण काम वेगाने सुरू करण्याच्या सूचना डार्स कंपनीला दिले असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

‘पीपीपी’ निविदासाठी मार्गदर्शन
विमानतळावरील कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकाराचे प्रशिक्षण द्यावे याबरोबरच एअर प्लॅन तयार करणे, इमारतींचे आराखडे तयार करणे आदी गोष्टीत डार्स कंपनी मार्गदर्शन करणार आहे. पीपीपीवरील निविदा प्रक्रिया राबविण्यापर्यंत ही कंपनी महामंडळाला मार्गदर्शन करणार आहे. या अहवालात विमानतळाची ‘ईस्टेमट कॉस्ट’ ही देणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार या विमानतळासाठी सुमारे चौदा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात डार्स कंपनीकडून अहवाल सादर झाल्यानंतरच नक्की किती खर्च येईल, हे स्पष्ट होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

अहवालातून हे स्पष्ट होणार
 विमानतळ सुरू झाल्यानंतर एकाच वेळी किती विमानाचे उड्डाण होईल
 प्रवाशांची संख्या किती राहील आणि भविष्यात ती किती वाढू शकेल
 आर्थिकदृष्ट्या हे विमानतळ किती फायद्यात राहील
 विमानतळावर कोणत्या सुविधा द्याव्या लागतील
 महसूल कशा पद्धतीने जमा होईल

Web Title: pune news Purandar Airport