ऊर्जा साठवणुकीतील ‘पुढचे पाऊल’

ऊर्जा साठवणुकीतील ‘पुढचे पाऊल’

पवनचक्की, सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक स्रोतांपासून होणाऱ्या वीजनिर्मितीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या ग्रीडमध्ये किती वीज उपलब्ध आहे आणि मागणी-पुरवठ्याचे प्रमाण कसे राहील याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही, कारण स्थानिक हवामान व पर्यावरणीय बदलांमुळे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे गणित बिघडू शकते. त्यामुळे अपारंपरिक स्रोतांचा पूर्ण क्षमतेने वापर होऊ शकत नाही. ही व्यावहारिक अडचण सोडविण्यासाठी अपारंपरिक स्रोतांपासून निर्माण होणारी ऊर्जा साठवून ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. ऊर्जा साठवून ठेवता आल्यास त्याचा पुरवठा निश्‍चित करता येईल. ऊर्जा साठविणारी बॅटरी उच्च कार्यक्षमतेची असल्यास त्याचा योग्य वापर सामान्य माणसापासून कृषिपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत होऊ शकतो. अशा प्रकारच्या सोडिअम निकेल क्‍लोराइड बॅटरीचे तंत्रज्ञान १९८०च्या दशकात अस्तित्वात आले. या तंत्रज्ञानात व उत्पादन प्रक्रियेत थोडासा बदल अत्यंत कमी पैशात, देखभालीशिवाय आणि पर्यावरणपूरक पद्धतीने ऊर्जा साठवणूक करणाऱ्या बॅटरीची निर्मिती करण्याचे स्वप्न शैलेश रांका, सिद्धार्थ मयूर आणि अमरनाथ चक्रदेव या तीन तरुणांनी दोन वर्षांपूर्वी पाहिले. सोडिअम निकेल क्‍लोराइड या तंत्रज्ञानावर आधारित या नावीन्यपूर्ण बॅटरींचे भारतात व परदेशात उत्पादन करण्यात येणार आहे. संशोधन, प्रॉडक्‍ट डेव्हलपमेंट, टेक्‍नॉलॉजीवर अमरनाथ चक्रदेव काम करत आहेत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवसायवृद्धीसाठी जबाबदारी शैलेश रांका यांनी उचलली आहे. 

इलेक्‍ट्रिकल एनर्जी स्टोअरेजच्या प्रक्रियेत दोनशे ते अडीचशे केमिस्ट्री असतात. इलेक्‍ट्रिकल ते केमिकल आणि पुन्हा त्यातून इलेक्‍ट्रिकल एनर्जी मध्ये रूपांतरित होत असते. ही प्रक्रिया सातत्याने करणाऱ्या डिव्हाईसला बॅटरी म्हटले जाते. या प्रक्रियेदरम्यान कमीत कमी डिग्रेडेशन होईल, अशा तंत्रज्ञानाची सध्या गरज आहे. ही गरज भागविण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मेक इन इंडिया आवाहनाला प्रतिसाद देत शैलेश रांका यांनी ‘आर क्‍यूब’ची स्थापना केली. 

‘आर क्‍यूब’ बॅटरीच्या तंत्रज्ञानाविषयी शैलेश रांका म्हणाले, ‘‘सोडिअम क्‍लोराइड, म्हणजे मीठ आणि निकेल ही आमच्या बॅटरीतील मुख्य घटक आहेत. निकेल विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामध्ये बिटाल्यूमिनस सिरॅमिक ट्यूब असणार आहेत. बॅटरीमध्ये जळणारा कोणताच घटक नसल्यामुळे त्याला वातानुकुलनाची गरज भासत नाही. परिणामतः कोणत्याही अपघाताचा किंवा स्फोटाचा धोका संभवत नाही.’’

‘‘सुमारे हजार शास्त्रज्ञ काम करतात अशा ‘फ्रॅनहॉफर आयकेटीएस’ या जर्मन इन्स्टिट्यूटबरोबर आम्ही तंत्रज्ञान-हस्तांतरणाचा करार केला आहे. करारानुसार आम्ही या बॅटरीचे उत्पादन करणार आहोत. पाच kwh ते अनेक Mwh एवढी या बॅटरीची क्षमता असणार आहे. ‘मेक इन इंडिया’ धोरणाला अनुसरून आम्ही देशातच मॅन्युफॅक्‍चरिंग युनिट स्थापन करणार आहोत. अशा स्वरूपाचा हा देशातील पहिलाच प्रकल्प असेल. बॅटरीचे प्रोटोटाइप डिसेंबर २०१८पर्यंत तयार होणार असून, प्रत्यक्ष उत्पादन आणि व्यावसायिक विस्तार २०१९मध्ये होईल,’’ असेही त्यांनी सांगितले. 

एक तृतीयांश दरात मिळणार ऊर्जा 
सरकारच्या ‘इलेक्‍ट्रिक व्हेइकल’ धोरणानुसार विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. सध्या लोकप्रिय ठरत असलेल्या लिथिअम आयन तंत्रज्ञानावर आधारित बॅटरीच्या तुलनेत एक तृतीयांश दरामध्ये नव्या तंत्रज्ञानावर आधारित सोडिअम निकेल क्‍लोराइड बॅटरी उपलब्ध होऊ शकते. आम्ही हा खर्च कमी करू शकतो कारण आम्ही तंत्रज्ञानात थोडे बदल केले आहेत व त्याचे पेटंट घेतले आहे. 

सोडिअम निकेल क्‍लोराइड बॅटरीचे फायदे 
पर्यावरणपूरक बॅटरी. 
पंधरा वर्षांची बॅटरी लाइफ. 
पंधरा वर्षांच्या लाइफनंतर रिसायकल होऊ शकते.
डॉर्मंट स्टेटमध्ये जाऊ शकते. म्हणजे अगदी पन्नास वर्षांनंतर ‘रि-हीट’ केल्यावरही ती चार्ज होते. 
आपत्कालीन परिस्थितीत रेस्क्‍यू व्हेइकलसाठी उपयुक्त. 
बॅटरी एस्टिमेशन ऑफ चार्ज सांगू शकेल. 
बॅटरीला दहा टक्के ओव्हरचार्ज व डिस्चार्ज कपॅसिटी आहे.
घरगुती वापरासाठी, बस, टेलिकॉम टॉवर, मिलिटरी ॲप्लिकेशन्स, कोल्ड स्टोअरेज, लोकोमोटिव्ह, स्टेशनरी ॲप्लिकेशन्ससाठी उपयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com