रेल्वेला पुन्हा पावसाचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

पुणे - मुंबईत सुरू असणाऱ्या संततधार पावसाचा रेल्वे प्रशासनाला पुन्हा एकदा फटका बसला आहे. पावसामुळे बुधवारी मुंबईहून पुण्याला येणारी डेक्कन एक्‍स्प्रेस आणि पुण्याहून मुंबईला जाणारी सिंहगड एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली. तर, पुणे-भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेसच्या मार्गात बदल करून ही गाडी दौंड-मनमाडमार्गे सोडण्यात आली. गुरुवारी (ता. 21) मुंबई-पुणे डेक्कन एक्‍स्प्रेस, पुणे-मुंबई सिंहगड व इंटरसिटी एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. 

पावसाचा वाढलेला जोर आणि मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बुधवारी पावसामुळे अचानक डेक्कन आणि सिंहगड एक्‍स्प्रेस रद्द केल्याने अनेक प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे पुणे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. बुधवारी या दोन गाड्यांबरोबरच मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्‍स्प्रेस, मनमाड-एलटीटी गोदावरी एक्‍स्प्रेस, सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्‍स्प्रेस, एलटीटी-मनमाड गोदावरी एक्‍स्प्रेसदेखील रद्द करण्यात आल्या. त्याचबरोबर भुसावळ-पुणे व पुणे-भुसावळ एक्‍स्प्रेस पनवेलऐवजी मनमाड-दौंडमार्गे वळविण्यात आली. या दोन्ही रेल्वे गुरुवारीही याच मार्गे धावणार आहेत. त्याचप्रमाणे शुक्रवारी (ता. 22) मुंबई-पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्‍स्प्रेसही रद्द करण्यात आल्याचे रेल्वे 

प्रशासनाकडून सांगण्यात आले. 
दोन आठवड्यांपूर्वी पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा पावसामुळे विस्कळित झाली होती. ती पूर्वपदावर येण्यास तीन दिवसांचा कालावधी लागला होता. ती सुरळीत होत नाही, तोच आज पुन्हा मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने रेल्वेसेवा विस्कळित झाली. 

एसटी सेवा सुरळीत 
मुंबई, पुण्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. मात्र, काल दिवसभर एसटीची सेवा सुरळीत होती. परंतु, पावसाचा जोर पाहता आज अनेक चाकरमान्यांनी प्रवास करणे टाळले. त्यामुळे शहरातील एसटी स्थानकांवर शुकशुकाट होता. एसटी प्रशासनातर्फे वेळेवर गाड्या सोडण्यात येत असल्या तरी प्रवाशांची संख्या निम्म्याने घटली होती, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: pune news railway rain