बारामती: रेल्वेच्या हद्दीतील सेवा रस्त्यांच्या विकासासाठी प्रस्ताव

मिलिंद संगई
गुरुवार, 13 जुलै 2017

सुळेंनी दिला पाच लाखांचा निधी
दरम्यान रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, नवीन बाके बसविणे, दुरुस्ती तसेच पोलिसांना बसण्यासाठी खोली उभारण्याच्या कामासाठी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या खासदारनिधीतून पाच लाख रुपये देण्याची घोषणा या वेळी केली. रेल्वे मैदानावरील जुनी पोलिस चौकी पाडून मैदान मोठे करणे व फलाटावरच पोलिस कायम राहतील या साठी त्यांच्यासाठी एक खोली उभारुन देण्यासही रेल्वेच्या अधिका-यांनी मान्यता दिली. 

बारामती : शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रेल्वेच्या हद्दीतील सेवा रस्त्याचा प्रस्ताव दिल्लीला पाठविण्याबाबत आज (गुरुवार) पुण्यात झालेल्या बैठकीत निर्णय झाला. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत बारामतीतील रेल्वेशी संबंधित काही विषय मार्गी लावले. रेल्वेच्या पुणे विभागाचे प्रबंधक बी. के. दादाभोय, वाणिज्य व्यवस्थापक रवी झा, वाणिज्य अधिकारी कृष्णात पाटील या प्रसंगी उपस्थित होते. 

भिगवण रस्त्यावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी नगरपालिकेने साडेसात मीटर लांबीच्या सेवा रस्त्याचा प्रस्ताव रेल्वेकडे सादर केला आहे. मात्र या रस्त्याबाबत पुणे स्तरावर निर्णय घेणे शक्य नसल्याने दिल्लीस्तरावरुनच हा निर्णय होणे आवश्यक असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या बाबत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करुन परवानगी मिळविण्याबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. 

रेल्वेचा मालधक्का शहराबाहेर हलविण्याची मागणी या बैठकीत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, समन्वयक प्रवीण शिंदे आदींनी केली. जो पर्यंत पर्यायी मालधक्का उभा राहत नाही तो वर हा मालधक्का हलविणे अशक्य असल्याचे रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले. मात्र तरीही या बाबत काय करता येईल याच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना सुप्रिया सुळे यांनी रेल्वेच्या अधिका-यांना केल्या. 

शहराला पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या टाकीसाठी पाईपलाईन टाकताना रेल्वे लाईन क्रॉसिंगची गरज भासणार आहे, त्याची परवानगी देण्याचेही रेल्वेच्या अधिका-यांनी या वेळी मान्य केले. या शिवाय रेल्वेशी संबंधित काही अडचणींचीही माहिती या वेळी देण्यात आली. या सर्व प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची ग्वाही दादाभोय यांनी दिली. 

सुळेंनी दिला पाच लाखांचा निधी
दरम्यान रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, नवीन बाके बसविणे, दुरुस्ती तसेच पोलिसांना बसण्यासाठी खोली उभारण्याच्या कामासाठी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या खासदारनिधीतून पाच लाख रुपये देण्याची घोषणा या वेळी केली. रेल्वे मैदानावरील जुनी पोलिस चौकी पाडून मैदान मोठे करणे व फलाटावरच पोलिस कायम राहतील या साठी त्यांच्यासाठी एक खोली उभारुन देण्यासही रेल्वेच्या अधिका-यांनी मान्यता दिली. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Pune news railway road project developed