पुण्यात तीन दिवसांत 57 मिलिमीटर पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

पुणे - शहरात गेल्या सहा दिवसांमध्ये 76.6 मिलिमीटर पाऊस पडला असून, 57 मिलिमीटर पाऊस शेवटच्या तीन दिवसांमध्ये पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे रविवारी देण्यात आली. पुढील दिवसांमध्ये पावसाच्या काही सरी पडण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. 

शहर आणि परिसरात 10 जूनला पावसाला सुरवात झाली. जूनच्या अखेरीपर्यंत दमदार पवासाने हजेरी लावली होती. सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. मात्र, जुलैमध्ये खंड पडला होता. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पुन्हा मॉन्सून सक्रिय झाला आहे, त्यामुळे पुणे शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. 

शहरात 11 ते 16 जून या सहा दिवसांमध्ये 76.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यातील 57 मिलिमीटर पाऊस तीन दिवसांमध्ये झाला आहे. त्यापूर्वीचे तीन दिवस कोरडे होते, त्यामुळे शहरात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याचे चित्र दिसत आहे. 

Web Title: pune news rain