वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पुणे - ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने पुण्याच्या काही भागाला रविवारी संध्याकाळी झोडपले. पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तवली आहे. 

पुणे - ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने पुण्याच्या काही भागाला रविवारी संध्याकाळी झोडपले. पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तवली आहे. 

शहरात सकाळपासून उन्हाचा चटका वाढला होता. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत कमाल तापमान 4.3 अंश सेल्सिअसने वाढून 32.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले. दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले आणि संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. सिंहगड रस्ता, पाषाण, बाणेर, कात्रज, कोथरूड, शिवाजीनगर या भागात संध्याकाळी सहाच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली. स्थानिक वातावरणाच्या परिणामामुळे हा पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. 

कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सोमवारी (ता. 11) बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी (ता. 12) कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलक्‍या पावसाचा अंदाज आहे. 

राज्यातील काही भागात हवेचा दाब कमी-अधिक होत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी रविवारी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अमरावतीमधील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून, अनेक ठिकाणी ढगाळ हवामान असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी येत्या बुधवारपर्यंत (ता. 13) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पलूस, सांगोला, येवला, कवठे महांकाळ, खंडाळा, बावडा, खेड राजगुरुनगर, दहिवडी, माण अशा अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका पाऊस पडला. 

Web Title: pune news rain