मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पुणे - कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

राज्यात कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी बुधवारपर्यंत (ता. 20) मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गेल्या चोवीस तासांत कोकण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणीही पावसाची नोंद झाली आहे. 

नैर्ऋत्य मौसमी वारे (मॉन्सून) उत्तर भारतात सक्रिय आहेत. त्यामुळे उत्तर भारतातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होत आहे. महाराष्ट्रात मात्र स्थानिक वातावरणाच्या परिणामामुळे काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढला. त्यामुळे स्थानिक वातावरणाचा परिणाम होऊन पाऊस पडत असल्याचे निरीक्षणही हवामान तज्ज्ञांनी नोंदविले. 

पुण्यात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कमाल तापमानाचा पारा 28.2 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. कमाल तापमानात सरासरीपेक्षा 2.1 अंश सेल्सिअसची वाढ झाली होती. सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली. रात्री आठ वाजता पावसाच्या सरी पडल्या. मध्य वस्तीसह सिंहगड रस्ता, कात्रज, कोथरूड, पाषाण या भागात पावसाचा जोर जास्त होता. 1 जूनपासून आतापर्यंत शहरात 621.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

कमाल तापमान @ 29 
पुण्यात पुढील तीन दिवसांमध्ये पावसाच्या काही सरी पडण्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला. कमाल तापमानाचा पारा 29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असून, किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जाईल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

Web Title: pune news rain