रस्त्यावर पाणीच पाणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे - परतीच्या पावसाने शहराला बुधवारी झोडपले. सकाळपासून सुरू झालेला सरीचा जोर दुपारपर्यंत कायम होता. पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे - परतीच्या पावसाने शहराला बुधवारी झोडपले. सकाळपासून सुरू झालेला सरीचा जोर दुपारपर्यंत कायम होता. पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

शहरात गेल्या दोन दिवसांपासून ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत होता. सकाळी उन्हाचा चटका, दुपारी ढगाळ वातावरण आणि रात्री पाऊस असे वातावरण गेल्या आठवड्यापासून पुणेकर अनुभवत आहेत. बुधवारी सकाळी मात्र सात वाजल्यापासून पावसाच्या मुसळधार सरींनी सुरवात झाली. थोड्या वेळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारी बारा वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे दुपारच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या मुलांची धांदल उडाली. परीक्षेच्या वेळेत शाळेत पोचताना रिक्षावाले आणि स्कूल बसचालकांना कसरत करावी लागली. दुपारी चार वाजल्यानंतर मुसळधार पावसाने उघडीप घेतली असली, तरीही पावसाच्या तुरळक सरी पडत होत्या. 

शहरात पडणारा हा पाऊस परतीचा मॉन्सून असल्याची माहिती हवामान खात्यातून देण्यात आली. 

जोरदार पावसामुळे शहरात रस्त्यांवर पाणी साचले होते. पावसाचा वाढत्या वेगाबरोबर रस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा लोंढा वेगाने वाढत होता. त्यामुळे दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला गाडी लावून पावसापासून संरक्षण घेत होते, तर चार चाकी वाहने दिवे लावून चालवत येत असल्याचे चित्र भर दुपारी शहरात दिसत होते. 

कमाल तापमानाचा पारा घसरला 
ऑक्‍टोबरच्या सुरवातीलाच सरासरीपेक्षा चार अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाच्या पाऱ्याने उसळी घेतली होती. त्यामुळे या महिन्याच्या सुरवातीलाच "ऑक्‍टोबर हीट'चा तडाखा जाणवू लागला होता. उकाडा वाढला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी वातावरणात वेगाने बदल झाला. ढगाळ वातावरण आणि पावसाच्या पडणाऱ्या सरी यामुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी झाले. बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे कमाल तापमानाचा पारा कमी झाला आहे. 

Web Title: pune news rain