बारामतीत पावसाच्या जोरदार सरी

मिलिंद संगई
बुधवार, 14 जून 2017

बारामती - शहर व परिसरात आज (बुधवार) सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. जोरदार पावसाने बारामतीचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने बारामतीकरात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान धरणक्षेत्रातील वीर व भाटघर परिसरात देखील चांगला पाऊस व्हावा व ही धरणे लवकर भरावीत अशी प्रार्थना बारामतीकर करीत आहेत. 

दरवर्षीच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान वरुणराजा हजेरी लावतो. यंदा पालखीपूर्वी दहा दिवस अगोदरच पावसाने जोरदार सलामी दिली. बारामती शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्या नीरा डावा कालव्यावर अवलंबून आहे त्या नीरा डावा कालव्याचे आवर्तन येत्या 20 जूनपासून सुरु होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या 24 जून रोजी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बारामतीत विसावणार आहे, त्या मुळे आता प्रशासनाची त्या दृष्टीने तयारी सुरु झाली आहे. 

बारामती तालुक्यात गेल्या काही दिवसात झालेल्या ओढा सरळीकरण खोलीकरणाच्या कामांनाही दमदार पावसाची प्रतिक्षा असून पहाटेपासून सुरु असलेल्या पावसाने बारामतीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
VIDEO: लंडनमध्ये 27 मजली इमारतीला भीषण आग
डास, चिलटांमुळे भूकंप होत नाही - भाजपकडून प्रतिहल्ला
#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'​
दोन मिनिटांनी मोठी निष्ठा टक्‍क्‍यांनीही पुढेच​

अमित शहांच्या दौऱ्यात शक्तीप्रदर्शनासाठी हजार रूपये
सरकार धमक्‍यांना घाबरत नाही - चंद्रकांत पाटील​

Web Title: Pune news rain in Baramati