जुन्नर परिसरात खोळंबलेली भातलावणी जोमाने सुरु

दत्ता म्हसकर
रविवार, 16 जुलै 2017

आदिवासी भागातील भात हेच मुख्य पीक आहे. सुमारे १२हजार ५००हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली येते. भात पिकाची ५० टक्के लावणीची कामे झाली होती तर काही भागात पुरेसा पाऊस न झाल्याने भात लावणी रखडली होती.

जुन्नर : जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाने ओढ दिल्याने भात लावणीची कामे खोळंबली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे ती जोमाने सुरु झाली आहेत.

आदिवासी भागातील भात हेच मुख्य पीक आहे. सुमारे १२हजार ५००हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली येते. भात पिकाची ५० टक्के लावणीची कामे झाली होती तर काही भागात पुरेसा पाऊस न झाल्याने भात लावणी रखडली होती.

गेल्या तीन दिवसांत  झालेल्या दमदार पावसाने आदिवासी भागातील ओढे नाले दुथडी भरुन वाहत आहेत  रस्ते , भाताची खाचरे जलमय झाली आहेत, आदिवासी शेतकरी चिखलणी व लावणी च्या कामात गुंतला असल्याचे पहावयास मिळत आहे. आंबोली ता.जुन्नर येथील भात लावणी ची तसेच निसर्ग  छायाचित्रे  सोबत पाठवत आहे.

Web Title: Pune news rain in junnar area