पुणे: खडकवासलातून 23 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

Khadakwasla Dam
Khadakwasla Dam

खडकवासला : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर धो धो पाऊस पडल्याने खडकवासला, पानशेत व वरसगाव हो तिन्ही धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे रात्री 11ला आठ पहाटे तीन वाजता 14 व सकाळी 7 वाजता 23 हजार क्यूसेक पाणी मुठा नदी पात्रात सोडण्यात आले.

खडकवासला येथे 24 तासात 37, पानशेत 57 तर वरसगावला 56 तर टेमघर येथे 60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. परिणामी, आता पानशेतमधून सुमारे रात्री 4 हजार क्यूसेक पाणी सोडले जात होते. ते सकाळी कमी करण्यात आली सध्या या धरणातूम 990 क्यूसेक पाणी अंबी नदीत सोडले जात आहे. 

वरसगावमधून रात्री एक हजार क्यूसेक पाणी मोसे नदीत सोडले जात होते. तो विसर्ग पहाटे 3552 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. टेमघर मधूम 127 क्यूसेक असे सुमारे
5000 क्यूसेक पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे. तसे खडकवासला धरणात मिळणारी ओढ्यातून सुमारे 18000 क्यूसेक पाणी जमा होत आहे. खडकवासला धरणात आता सर्व प्रकारे 24हजार क्यूसेक पाणी जमा होत असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत 23क्यूसेक व काळव्यातूम एक हजार असे 24 हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे.  खडकवासला धरण 100 भरल्यामुळे आणलेले पाणी पूर्ण सोडून द्यावे लागत आहे. 

खडकवासला धरणच्या खोऱ्यात जास्त पाऊस
फक्त खडकवासला धरणात 18 हजार क्यूसेक पाणी जमा होत आहे.  म्हणजे या खोऱ्यात जास्त पाऊस पडत आहे. टेमघर धरणाच्या भिंतीवर 60 मिलिमीटर पाऊस झाला आहे. भिंतीपासून खडकवासला धरणात पाणी जमा होते त्या सांगरून गावापर्यंत सर्व ओढे मुठा नदीला येऊन मिळतात. तसेच पाबे खिंडीत रांजणे, खामगाव, येथे आगळंबे ठाकरवाडी परिसरात, सिंहगड, आतकरवाडी, मनेरवाडी सांबरेवाडी परिसरात जास्त पाऊस झाला आहे या भागातून येणारे ओढे पूर्ण भरून वाहत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com