कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

पुणे - कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी शनिवारी (ता. 5) आणि रविवारी (ता.6) पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. पुणे आणि परिसरातही हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोकणात कणकवली, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, माथेरान, सावंतवाडी परिसरात, तर मध्य महाराष्ट्रात महाबळेश्‍वर, राधानगरी, गगनबावडा, इगतपुरी येथे पाऊस झाला. पुणे परिसरात हलक्‍या सरींचा पाऊस पडला.

Web Title: pune news rain in konkan center maharashtra