पाऊस सुरू झाल्याने मेंढपाळ परतीच्या मार्गावर...

युनूस तांबोळी
शुक्रवार, 16 जून 2017

टाकळी हाजी (शिरूर, जि. पुणे): वेशीच्या बाहेर माळरानावर, पडीक शेतजमिनीवर मेंढपाळाची पाले हमखास दिसतात. ऊन, वारा, पावसाच्या धारा अंगावर झेलत मेंढपाळ आपली जनावरे सांभाळत असतात. बिबट्यासारख्या वन्यप्राण्यांपासून आपल्या कळपाचे रक्षण करत व्यवसायाला भरभराटीला आणतात. मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्याने शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात आता मेंढपाळ परतीच्या मार्गाने जाताना पाहावयास मिळत आहेत.

दीपावलीनंतर चाऱ्याच्या शोधात मेंढपाळ घाटाकडे, कोकणात जातात. आठ महिने जनावरांना खाद्य उपलब्ध होईल, या आशेवर रानोमाळ ते भटकंती करतात. एका कळपात जास्तीत जास्त 60 ते 100 मेंढ्या सांभाळल्या जातात. पती मेंढपाळ असेल, तर पत्नी दररोज वेगवेगळ्या ठिकाणच्या मुक्कामाची व्यवस्था करते. त्यासाठी घोडा हे साधन वापरले जाते. या घोड्यावर मुक्कामासाठी तंबू, कोंबड्यासाठी डारले, संसारोपयोगी वस्तू वाहतूक केल्या जातात. एक जोडपे जवळपास आठ महिने भटकंती करत व्यवसाय करताना दिसतात. सध्या घाटमाथा व कोकणातून परतीच्या मार्गावर जाणारे मेंढपाळ दिसू लागले आहेत. शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम पावसाने हजेरी लावल्याने गावाच्या बाहेर, माळरानावर असे मेंढपाळ दिसू लागले आहेत.

"मेंढपाळांच्या मुलांसाठी सरकारने मदत केली पाहिजे. मुलांना आश्रम शाळेत घालून हा व्यवसाय करत असतो. सुटी लागली की मुलेदेखील या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी बरोबर येतात,'' असे कोहकडी (ता. पारनेर) येथील अजित टकले यांनी सांगितले.

■ ई सकाळवरील महत्वाच्या बातम्या

"भारत-सिंगापूर' मैत्रीमुळे चीन अस्वस्थ!
पवार 'समृद्धी' प्रकल्पाच्या विरोधात कसे?
#स्पर्धापरीक्षा - भारत-अमेरिका संरक्षण करार
'मुदतपूर्व'च्या फुक्‍या जोर-बैठका
पतधोरणाची पावले योग्य दिशेने
रविवारी भारत - पाकचा लंडनला डबल धमाका
भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल
कराल "नायगरा'ने गिळले विक्रमवीरास..
पुरूष नाटकामागे घडलेले नाट्य प्रथमच रंगमंचावर
लंडन : अग्नितांडवात किमान 65 मृत्युमुखी?
'SCO'त मतभेदांना स्थान नाही
ध्वनिक्षेपकावरून एकाच वेळी 'अजान'
लोकवर्गणीतून 7 कि.मी.पर्यंत नदीचे खोलीकरण व रुंदीकरण

Web Title: pune news rain start and shepherd return to home