शहरात आज हलक्‍या सरींची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

पुणे - शहरात स्वातंत्र्यदिनी हलक्‍या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस पावसाच्या तुरळक सरी पडण्याचा अंदाज आहे. 

पुणे - शहरात स्वातंत्र्यदिनी हलक्‍या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस पावसाच्या तुरळक सरी पडण्याचा अंदाज आहे. 

शहरात जून आणि जुलैदरम्यान पडलेल्या दमदार पावसाने ऑगस्टमध्ये विश्रांती घेतली आहे. ऑगस्टमध्ये श्रावणसरींची शहराला प्रतीक्षा होती; पण त्या पडल्या नाहीत. त्यामुळे ऑगस्टमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामानशास्त्रज्ञांनी दिली. शहरात 1 जून ते 14 ऑगस्टदरम्यान सरासरी 381.4 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा या कालावधीत आतापर्यंत 408.6 मिलिमीटर पाऊस पडला आहे. जून आणि जुलैमध्ये पडलेल्या दमदार पावसाने सध्या अडीच महिन्यांच्या पावसाची सरासरी ओलांडली असली, तरीही गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात पावसाने विश्रांती घेतली आहे, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

Web Title: pune news rain weather