रसिक मनाचा ठाव घेणारे निसर्गसौंदर्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

पुणे - कधी हिरवा शालू पांघरलेली पर्वतराजी... तर कधी लाल-तांबड्या रंगांची उधळण करत फुललेला निसर्ग... कधी हळूच पानांआडून नाजूकपणे डोकावणारे एखादे गोंडस फूल... कधी स्वछंदपणे आकाशात उडणारे पक्षी... अशी निसर्गचित्रे, सोबतच दैनंदिन जीवनातील विविध घटनांचे चित्रस्वरूप सादरीकरण पुणेकरांना अनुभवता येणार आहे.

निमित्त आहे रेनबो (इंद्रधनुष्य) चित्रप्रदर्शनाचे. याचे उद्‌घाटन चित्रकार मुरली लाहोटी आणि ताराचंद निकम यांच्या हस्ते बुधवारी झाले. हे प्रदर्शन मंगळवार (ता. ११) पर्यंत सेनापती बापट रस्ता येथील दर्पण कलादालनात सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत खुले असेल.

सात वेगवेगळ्या कलाकारांनी एकत्र येऊन भरविलेल्या या प्रदर्शनामध्ये विविध विषयांचे नयनरम्य रेखाटन पाहता येतील. चित्रकार प्रणाली हरपुडे यांनी साकारलेल्या दैनंदिन घटना; वृषाली गोहाड, आनंद केळकर, प्रसन्न मुसळे यांनी साकारलेली निसर्गचित्रे मनाला आनंद देतात. विशेष म्हणजे तानाजी अवघडे यांनी रेखाटलेली चित्रे रसिकांना एक वेगळ्या विश्‍वात घेऊन जातात. अमित बनकर यांनी सादर केलेली अमूर्त शैलीतील चित्रेही रसिक मनाचा ठाव घेतात.

Web Title: pune news rainbow drawing exhibition