"कंचन-हिरा' ठरतेय रुग्णांसाठी वरदान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पुणे - राजेश व जयंत शहा यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ "कंचन-हिरा आयुर्वेदिक हॉस्पिटल व कॅन्सर रिसर्च सेंटर' हा 70 खाटांचा अत्याधुनिक दवाखाना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आला. तेथे अत्यल्प दरात रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे हा दवाखाना रुग्णांसाठी वरदानच ठरत आहे. 

पुणे - राजेश व जयंत शहा यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ "कंचन-हिरा आयुर्वेदिक हॉस्पिटल व कॅन्सर रिसर्च सेंटर' हा 70 खाटांचा अत्याधुनिक दवाखाना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आला. तेथे अत्यल्प दरात रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे हा दवाखाना रुग्णांसाठी वरदानच ठरत आहे. 

या दवाखान्यात केवळ दहा रुपये फी, जनरल वॉर्डमध्ये मोफत उपचार व भोजनही दिले जाते. एक वर्षातील वाढती रुग्णांची संख्या पाहून पहिल्या मजल्यावर 30 खाटा वाढविल्या आहेत. त्याचे उद्‌घाटन मेहसाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एच. के. पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, आसपासच्या ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोफत आणण्यासाठी, तसेच उपचारानंतर परत सोडण्यासाठी "मोबाईल मेडिकल सेवे'चे उद्‌घाटन धवल शहा यांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजेश शहा उपस्थित होते. जिल्हाधिकारी पटेल यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच, या कार्यास लागेल ती प्रशासकीय मदत देण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अतुल भावसार म्हणाले, ""हिराभाई हे आमच्यासाठी देवच होते. त्यांचा दातृत्वाचा वारसा त्यांचे दोन्ही सुपुत्र राजेश व जयंत यांनी चालवला अन्‌ आता तोच वारसा तिसरी पिढी धवल हे जोमाने चालवत आहेत.'' 

या प्रसंगी "ग्राहकपेठ'चे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, दिनेश परमार व डॉ. कविता शहा उपस्थित होते. 

दरम्यान, जयराज ग्रुपच्या सर्व कर्मचाऱ्यांची एकदिवसीय सहल अहमदाबाद, गुजरात येथे राजेश व धवल शहा यांनी आयोजित केली होती. सकाळी सर्व जण विमानाने पुणे ते अहमदाबाद, तेथून त्यांच्या मूळ गावी पेढामली येथे गेले. तेथे त्यांनी अत्याधुनिक दवाखाना, हिराभाई शहा यांनी बांधलेली प्रगत शाळा व गावातील मंदिर पाहिले. त्यानंतर महुडी व अगलोड येथील तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन पुन्हा परत विमानाने पुण्यात आले. 

Web Title: pune news rajesh shah Mobile Medical Services