"अधिकारपदाचा फायदा पीडितांपर्यंत पोचवा' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

पुणे - ""स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी वेळेचे अचूक नियोजन, विचारांची स्पष्टता आणि सातत्य ठेवणे गरजेचे आहे. परीक्षेत यशस्वी होऊन प्रशासकीय अधिकारपदावर बसल्यानंतर आयुष्याची खरी परीक्षा सुरू होते. त्या पदाचा फायदा पीडित लोकांपर्यंत पोचवा,'' असे आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी केले. 

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, समाजकल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, समाजकल्याण विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे, प्राप्तिकर विभागाचे सहसचिव अजय डोके आदी उपस्थित होते. देशात अकरावी आणि राज्यात पहिली आलेली विश्‍वांजली गायकवाड हिच्यासह स्नेहल लोखंडे, जयदीप प्रदक्षिणे, राहुल जवीर, सूरज थोरात, रूपेश शिवदे, आदित्य रत्नपारखी, सौरभ सोनवणे, धम्मपाल खंडागळे, परिक्षित झाडे, माधव वणवे आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

राज्यमंत्री कांबळे म्हणाले, ""यशासाठी शॉर्टकट नसतो, कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. बाबासाहेबांचा आदर्श सर्व परीक्षार्थींनी ठेवला पाहिजे.'' 

स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शनासाठी बार्टीतर्फे अनुसूचित जाती व जमातींच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी समाजकल्याण विभागाकडून विद्यार्थीसंख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी बार्टीचे महासंचालक ढाबरे यांनी केली.

Web Title: pune news Rajkumar Badole barti