उद्योग-शिक्षण क्षेत्रामध्ये समन्वय आवश्‍यक - भोगले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

पुणे - ‘‘अभियांत्रिकी क्षेत्रात निर्मितीक्षम मनुष्यबळ उभारणीसाठी उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्या समन्वयाची नितांत गरज आहे,’’ असे मत ‘अप्लाइड इनोव्हेशन अँड टेक्‍नॉलॉजी ग्रुप’चे अध्यक्ष राम भोगले यांनी व्यक्त केले.

पुणे - ‘‘अभियांत्रिकी क्षेत्रात निर्मितीक्षम मनुष्यबळ उभारणीसाठी उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्या समन्वयाची नितांत गरज आहे,’’ असे मत ‘अप्लाइड इनोव्हेशन अँड टेक्‍नॉलॉजी ग्रुप’चे अध्यक्ष राम भोगले यांनी व्यक्त केले.

रोटरी क्‍लब ऑफ पुणे प्राइड आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘इंटेक ऑलिंपियाड २०१८’ या प्रकल्प सादरीकरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण भोगले यांच्या हस्ते झाले. या वेळी रोटरीचे प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर, ‘पुणे प्राइड’चे अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, प्रकल्प संचालक महेश कुलकर्णी, संयोजक श्रीहर्ष जोगळेकर आदी उपस्थित होते.

‘रिटेल फायनान्सिंग ऑन इलेक्‍ट्रिक थ्री व्हीलर’ या प्रकल्पाला सुवर्णपदक, तर ‘कार सर्व्हिसिंगसाठी मिश्र तंत्रज्ञानाधारित प्रणाली’ या प्रकल्पाला रौप्यपदक देऊन गौरवण्यात आले.

‘लघुविद्युतनिर्मिती प्रकल्पाचे अचूक मापन’ आणि ‘सौरऊर्जेची गॅस स्वरूपात साठवणूक व विद्युत स्वरूपात पुरवठा’ या प्रकल्पांना ब्राँझपदक विभागून देण्यात आले. अक्षय वर्मा याला भट स्मृती पुरस्कार, एम. अपूर्वाला जोशी स्मृती पुरस्कार, तर आसावरी जोशीला इंडप्रो पुरस्कार देण्यात आला. 

या स्पर्धेत १६ राज्यांतील ४१ महाविद्यालयांमधील ६७ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे, असे डॉ. पालेकर यांनी सांगितले. श्रीहरी जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले, सरिता बापट यांनी सूत्रसंचालन केले, तर दीपक फडणीस यांनी आभार मानले.

Web Title: pune news ram bhogale Industry area education