राजकारणात एकाच ठिकाणी कधीच राहायचे नसते ! - आठवले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

पुणे - "" राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पूर्वी आमचे मित्र होते; पण आज नाहीत. त्यांच्यासोबत बरीच वर्षे काढली. त्यांच्याकडूनच राजकारण शिकलो; मात्र त्यांना सोडून मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आलो आहे. कारण, राजकारणात एका ठिकाणी कधीच राहायचे नसते,'' असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. "ज्या दिशेने हवा आहे, त्या दिशेने जाणारेच राजकारणात यशस्वी होतात', असे गुपितही त्यांनी आपल्या खास शैलीत सांगितले. 

बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने बालगंधर्व परिवाराने आयोजिलेल्या कवी संमेलनाचे उद्‌घाटन आठवले यांच्या कवितांनी मंगळवारी झाले. या वेळी वात्रटिकाकार रामदास फुटाणे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, कवी भारत दौंडकर, बंडा जोशी, परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते. 

देशात झाल्यामुळे नोटाबंदी 
फारच परेशान झाले आहेत राहुल गांधी, 
देशात आली आहे नरेंद्र मोदींची आँधी 
त्यांनी तोडूनच टाकली आहे कॉंग्रेसची फांदी... 

- अशी कविता सादर करून आठवले म्हणाले, "" पुढची दहा वर्षे मी मोदी यांच्यासोबत असणार आहे. जोपर्यंत "हवा' आहे, तोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे. नंतरचा निर्णय "हवा कोठे जाते', हे पाहून घेतला जाईल.'' माझा कवी होण्याचा विचार होता; पण फक्त कवी झालो असतो तर उपाशी राहण्याचीच वेळ आली असती, अशी "वास्तवदर्शी' जाणीवही या वेळी त्यांनी स्वतःहूनच उपस्थितांना करून दिली. 

कारण मी आहे मंत्री 
"" आम्हा आठवले, आमचेही नाव आहे रामदास, मंत्री नसल्यामुळेच, असा आहे वनवास...'' अशी वात्रटिका फुटाणे यांनी या वेळी सादर केली. तेव्हा आठवले यांना राहावले नाही. माईक हातात घेऊन ते लगेच म्हणाले, "" मी नाही पुस्तकातला कवी. कारण मी आहे मंत्री !'' त्यांची ही कविता ऐकून सभागृहात हास्याचा धबधबा उसळला. 

Web Title: pune news ramdas athawale