माझ्याशी चांगले संबंध ठेवावेच लागतात - आठवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

पुणे - ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्याशी चांगले संबंध ठेवावेच लागतात. कारण त्यांना माहिती आहे, "हा कधी कोठे जाईल सांगता येत नाही,'' अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधानांवरच टिपण्णी केली. अनेकांना मी भारतीय जनता पक्षात गेलोय, असेच वाटते. ते खरे नाही. आमचा स्वतंत्र पक्ष आहे. जिकडे हवा आहे तिकडे मी गेलोय. सध्या मोदी "स्ट्रॉंग लीडर' आहेत, असेही ते म्हणाले. 

सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटन आठवले यांच्या हस्ते झाले. त्याआधी त्यांनी "सिंबायोसिस'मधील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. ते म्हणाले, ""माझा पक्ष देशभरात सर्वत्र आहे. मी जेथे जातो तेथे कार्यकर्त्यांचे थवे माझ्या मागे असतात. सध्या माझ्या विरोधात बोलले जात आहे; पण मी कोणासोबतही गेलो तरी माझ्या हातात कायम निळा झेंडा होता आणि यापुढेही राहील.'' 

विषमता, जातीयवाद दूर होण्यासाठी आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत, असे सांगून आठवले म्हणाले, ""जात, धर्म, भाषा विसरून आपण एकत्र यायला हवे; तरच राज्यघटनेतील भारत निर्माण होईल. आमच्या पक्षाचा, आमच्या सरकारचा जातिव्यवस्थेला अजिबात पाठिंबा नाही. जात मानू नका, असे कायदे आपल्याकडे पूर्वीच झालेले आहेत; पण जात संपवणे हे काम एकट्या सरकारचे नाही. ते आपल्या सर्वांचे आहे. मोदी सरकार आले म्हणूनच सध्या दलितांवर अत्याचार होत आहेत, असे नाही. सरकार कोणाचेही असो अत्याचार होऊ नयेत. हे महत्त्वाचे आहे, असेही आठवले यांनी सांगितले. 

मी पार्लमेंट ऍक्‍टर 
महोत्सवात "सिंबायोसिस सांस्कृतिक पुरस्कार' दिग्दर्शक निवेदिता बासू यांना आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर गायक भरत बलवल्ली यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, "सिंबायोसिस'चे डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होत्या. ""टागोर या बॉलिवूड ऍक्‍ट्रेस आहेत, तर मी पार्लमेंट ऍक्‍टर आहे. पुढे जर मी राजकारणात अपयशी झालो तर नक्कीच चित्रपटात जाईन'', अशी आशाही आठवले यांनी व्यक्त केली.

Web Title: pune news ramdas athawale RPI