...म्हणूनच तो होता खास : रामदास आठवलेंची कांबळेंना काव्यांजली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

उपमहापौर नवनाथ कांबळे यांना श्रद्धाजली अर्पण करण्यासाठी सर्व पक्षीय सभा आयोजित करण्यात आली होती.

पुणे : "शेवटचा असेपर्यंत श्वास, नवनाथ कांबळेचा माझ्यावर विश्वास, आंबेडकरी चळवळीची होती आस, म्हणूनच तो कार्यकर्ता होता खास" अशा कवितेतून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कांबळे यांना बुधवारी श्रद्धांजली अर्पण केली.

उपमहापौर नवनाथ कांबळे यांना श्रद्धाजली अर्पण करण्यासाठी सर्व पक्षीय सभा आयोजित करण्यात आली होती. महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार शरद रणपिसे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे, शिवसेनेचे श्याम देशपांडे, माजी कुलगुरू वासुदेव गाडे आदी उपस्थित होते.

Web Title: pune news ramdas athawale's poetic tribute to navnath kamble