शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे

सुशांत सांगवे
गुरुवार, 1 जून 2017

सरकार लवकर निर्णयच घेत नाही. जे वचन निवडणूकीपूर्वी भाजपाने दिले त्याच आज मागण्या आहेत. पूर्वीचे निष्क्रीय होते म्हणून लोक यांच्या पाठीशी राहिले. पण शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत.

पुणे - 'शेतीचे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा", अशी अपेक्षा वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी गुरुवारी व्यक्त केली.

सरकार लवकर निर्णयच घेत नाही. जे वचन निवडणूकीपूर्वी भाजपाने दिले त्याच आज मागण्या आहेत. पूर्वीचे निष्क्रीय होते म्हणून लोक यांच्या पाठीशी राहिले. पण शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. उत्पादन खर्चाएवढेही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, हे सत्य आहे. सरकारच्या फालतू खर्चामुळे, निवडणूकातील उधळपट्टीमुळे खरा शेतकरी दुर्लक्षित होत आहे. शिवाय त्याला जातीजातीत विभागणारे नेतेही सध्या वाढले आहेत. हा प्रश्न गंभीर आहे, असेही फुटाणे म्हणाले.

शेतात जाणाऱ्या बळिराजाने नांगर खाली ठेवला असून, चक्क संपाचे हत्यार उपसले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला बुधवारी मध्यरात्रीपासून सुरवात झाली. शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य भाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
जनावरे खरेदी-विक्रीच्या निर्णयात हस्तक्षेप नाही- केरळ उच्च न्यायालय​
प्रशासकीय नव्हे; परराष्ट्र सेवेत जाणार​
करिअरसाठी स्काय इज द लिमिट​
मराठवाड्यात दीडशे दिवसांत 361 शेतकरी आत्महत्या​
मंत्री झालो याची शेट्टींना असुया..! - सदाभाऊ खोत​
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला

Web Title: pune news Ramdas Phutane supports farmers strike