राम जन्मला गं सखी...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

पुणे - चैत्र शुद्ध नवमीनिमित्त तुळशीबाग येथील श्री रामजी संस्थानच्या राम मंदिरामध्ये रविवारी माध्यान्हानंतर पाऊणच्या सुमारास रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी जय श्रीरामाच्या जयघोषात महिलांनी ‘राम जन्मला गं सखी’ हा पाळणा म्हटला. 

सदाशिव पेठेत सदावर्ते राम मंदिर, रहाळकर राम मंदिर, ताई रास्ते राम मंदिर, गाडगीळ राम मंदिर, पुणे विद्यार्थीगृह राम मंदिर, नारायण पेठ येथील काटे राम मंदिर, भाजीराम मंदिर, शनिवार पेठ येथील जोशी राम मंदिर, कसबा पेठ येथील राम मंदिर, ओम पतित पावन संघटना, पुणे लष्कर परिसरातील नामदेव शिंपी समाज राम मंदिर, कात्रज येथील राधाकृष्ण महिला गट, पार्वती चव्हाण सोशल फाउंडेशन आणि श्रीराम अभिमन्यू मंडळ ट्रस्टसह विविध गणेशोत्सव मंडळांनीही रामनवमी साजरी केली. भारतीय वारकरी मंडळाने मिरवणूक आणि विश्‍व हिंदू परिषदेने विविध कार्यक्रम घेतले.

व्याख्याने अन्‌ गायन
जन्म व्याख्यानाचे कीर्तन आणि पाळणा गायन करण्यात आले. भाविकांना सुंठवडा, कलिंगड, टरबूज, साखरगाठी अन्‌ रेवड्यांचा प्रसाद देण्यात आला. सर्व मंदिरांमध्ये देवतांच्या मूर्तींना भरजरी वस्त्रे आणि अलंकारांनी भूषविले होते.

Web Title: pune news ramnavami celebration