सुख, शांततेसाठी अल्लाहकडे दुवा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

पुणे - अल्लाहू अकबर... अल्लाहू अकबर... अस्सलाम अलैकूम... वालेकूम अस्सलाम... ईद मुबारक भाईजान-ईद मुबारक.... आओ गले मिलो... ईद मुबारक... ईद उल फित्र अर्थातच रमजान ईदनिमित्त मुस्लिम धर्मीयांना अन्य धर्मीयांकडून शुभेच्छा देण्यात येत होत्या. गोळीबार मैदानाजवळील ईदगाह मैदानावर सकाळी दहा वाजता हजारो मुस्लिम धर्मीय नागरिकांनी सामूहिक नमाज अदा करून देशात सुख, समाधान, शांतता नांदावी म्हणून अल्लाहकडे दुआ केली. 

रविवारी (ता. 25) चंद्रदर्शन झाल्याने देशात सोमवारी (ता. 26) ईद साजरी करण्यात आली. सकाळच्या प्रसन्न वातावरणात नवे कपडे परिधान करून हजारो मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर मौलाना निजामुद्दीन फकरुद्दीन यांच्यासमवेत नमाज अदा केली. पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, आमदार जयदेव गायकवाड, मोहन जोशी, नगरसेविका मनीषा लडकत, चंदू कदम, मुश्‍ताक पटेल यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गुलाबाचे फूल देऊन मुस्लिम धर्मीयांचे स्वागत करण्यात आले. 

""इस्लाम मानवतेचा धर्म आहे. विविध धर्मीय नागरिक ईदला एकत्र येतात, ही या देशातील हजारो वर्षांची परंपरा आहे. जातीय सलोख्यासह आनंदाने एकमेकांच्या सहकार्याने देशाची प्रगती करणे, हीच या देशाची शान आहे,'' असा संदेश मौलाना निजामुद्दीन फकरुद्दीन यांनी दिला. 

शहर व उपनगरांतील विविध मशिदींमध्ये सकाळी साडेसात वाजल्यापासून ईदची नमाज अदा करण्यात आली. आनंदाचा संदेश घेऊन आलेल्या ईदचे स्वागतही मोठ्या उत्साहात मुस्लिम धर्मीयांच्या घरोघरी पाहायला मिळाले. सामिष भोजनासह शिरखुर्म्याचा बेतही आखण्यात आला होता. यानिमित्त मुस्लिम धर्मीयांनी गृहसजावटही केली होती. नातेवाईक, मित्र परिवारांनाही आमंत्रित करण्यात आले होते.

Web Title: pune news ramzan eid