शिरूर तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी

युनूस तांबोळी
सोमवार, 26 जून 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): नवीन पठाणी पेहराव डोक्यावर टोपी अन् अत्तराचा दरवळलेला सुंगध त्यातच शिर्रर्खुमा व गुलगुल्याच्या आस्वादाने शुभेच्छाचा वर्षाव करत मुस्लीम बांधवानी ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पावसाळी वातावरणामुळे इदगाह मैदानाऐवजी मस्सिद मध्ये ईदची नमाज पठण करण्यात आले. हिंदू- मुस्लीम बांधवानी या सणाचे महत्व वाढवीत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मुस्लीम बांधवाना दुरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या. कवठे येमाई येथे मौलाना अब्दुल रज्जाक यांनी मुस्लीम बांधवांना मार्गदर्शन केले. नमाजपठण नंतर घोडगंगेचे संचालक राजेंद्र गावडे व पंचायत समिती सदस्य डॅा. सुभाष पोकळे यांनी मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या.  टाकळी हाजी येथे मौलाना आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण झाले. माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परीषद सदस्य सुनीता गावडे, पंचायत समिती सदस्य अरूणा घोडे, सरपंच दामुशेठ घोडे व शहानुर शेख यांनी मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या. कान्हूर मेसाई येथे मौलाना सद्दाम हुसेन यांनी मार्गदर्शन केले. पोलिस कर्मचारी प्रल्हाद सातपुते यांचा सत्कार यावेळी मुस्लीम बांधवांच्या वतीने करण्यात आला. मलठण, जांबूत, रावडेवाडी, पिंपरखेड या ठिकाणी मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले. पावसाळी वातावरणामुळे बहुतेक ठिकाणी मस्जीद मध्ये नमाज पठण करण्यात आले. दुपारी शिर्रर्खुमा व गुलगुले वाटपाचा कार्यक्रम पार पडला. शिरूरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे यांनी या परीसरात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शांततेत हा उत्साह साजरा करण्यात आला.

माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, मुस्लीम बांधवांच्या धार्मीक विधीसाठी लागणाऱ्या भौतीक सुवीधा पुरवील्या गेल्या पाहिजेत. आरोग्य व शैक्षणीक सुवीधा पुरवीत असताना विविध योजनाचा लाभ मुस्लीम बांधवांनी घ्यावा. त्यातून मुलींच्या उच्चतम शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Web Title: pune news ramzan eid celebrate in shirur taluka