जुन्नरमध्ये मिरवणूक व नमाज पठणाने रमजान ईद उत्साहात

दत्ता म्हसकर
सोमवार, 26 जून 2017

बादशहा तलाव, चिंचोली येथील मशीदित नमाज पठण कार्यक्रम संपन्न झाला. 

जुन्नर : आज सोमवारी जुन्नर शहर व परिसरात रमजान ईद नमाज पठण व विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. जुन्नर शहरातील दिवाण-ए-अहमद मशिदीपासून हाफिज मौलाना इमरान बेग यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीने मुस्लिम बांधव सामूहिक नमाज पठणासाठी इदगाह मैदानावर जमा झाले. 

नमाज पठण झाल्यानंतर अप्पर पोलिस आधिक्षक तेजेस्वि सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी जयश्री देसाई यांनी उपस्थित धर्मगुरू व मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या, तर ईदगाह कमिटीच्या वतीने राष्ट्रीय एकता मंचचे अध्यक्ष हाजी मिर्झा कुद्दुस बेग, नगरसेवक जमीर कागदी यांनी तेजस्वी सातपुते, जयश्री देसाई, पोलिस निरीक्षक कैलास घोडके, सोमनाथ दिवटे, यांचा सत्कार केला 
दरम्यान, जुन्नर शहरातील पिरजादे वाडा, खलिल पुरा, माई मोहल्ला, दिवाण-ए-अहमद, संगतराश, जुम्मा मशीद या प्रमुख मशिदीमध्ये अनुक्रमे मौलाना सुफियान, हाफिज मौलाना रिजवान कुरेशी, सादिकुल ईस्लाम, मौलाना रफिक व मौलाना नहिद रजा व सर्वात शेवटी ईदगाह मैदान येथे हाफिज इमरान बेग यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नमाज पठण कार्यक्रम पार पडला. 
जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक समीर भगत, अविनाश करडिले, अंकिता गोसावी, गणेश वाकचौरे व नगर पालिका अधिकारी यांनी पालिका कार्यालयासमोर मिरणुकीत सहभागी धर्मगुरू व मुस्लिम बांधवाचे पुष्प देऊन स्वागत केले. 
जातीय सलोखा भाईचारा कायम ठेवून देश व समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहा, असा संदेश बेग यांनी दिला दुवा पठ्ण झाल्यानंतर सांगता झाली. 

दरम्यान बादशहा तलाव, चिंचोली येथील मशीदित नमाज पठण कार्यक्रम संपन्न झाला. आमदार शरद सोनवणे, अतुल बेनके, आशा बुचके, माजी नगराध्यक्ष किरण परदेशी, माजी उपनगराध्यक्ष सलिम गोलंदाज, नगरसेवक जमिर कागदि, फिरोज पठाण, दिनेश दुबे यांनी मुस्लिम बांधवांना इद्च्या शुभेच्छा दिल्या.
 

Web Title: pune news ramzan eid ramadan junnar news