पिंपरी: विनयभंग करणाऱ्याला एक वर्षाची शिक्षा

संदीप घिसे
गुरुवार, 8 मार्च 2018

सचिन शिवाजी येडे (वय २८ रा. शिंदेवस्ती, रावेत) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पिंपरी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना २०१४ मध्ये निगडी येथे घडली. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची शिक्षा आणि दीड हजार रुपये दंड ठोठावला.

सचिन शिवाजी येडे (वय २८ रा. शिंदेवस्ती, रावेत) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जानेवारी २०१४ आरोपी सचिन याने अल्पवयीन मुलीच्या वडिलांना रस्त्यात गाठले. तुमच्या मुलीचा एमएमएस आणि फोटो माझ्याकडे असून त्या फोटोंचा मी गैरवापर करणार आहे.

यामुळे पिडित मुलीच्या वडिलांनी आरोपी सचिन याच्या हातातील मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांचा चावा घेतला. तसेच फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग देखील केला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस उपनिरीक्षक एस. यू. कांबळे यानी केलेल्या तपासाच्या आधारे भक्कम पुराव्यावरून आरोपी सचिन येडे याला एक वर्षाची शिक्षा आणि दीड हजार रूपये दंड अशी सुनावली.

Web Title: Pune news rape case convicted