संपातही अन्नधान्य वितरण सुरळीत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पुणे - विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील महसूल आणि पुरवठा कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. तरीही कंत्राटदारांकडून अन्नधान्य वितरण सुरळीत सुरू आहे. तसेच कार्यालयीन कामांमध्ये अन्य विभागांतील आणि कंत्राटी कामगारांकडून अत्यावश्‍यक कामे करवून घेतली जात असल्याने कामकाज संथगतीने सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. 

"राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013'अंतर्गत अंत्योदय आणि बिगर अंत्योदयमध्ये अन्नधान्य साठ्यातून नोव्हेंबरसाठी अन्नधान्य देण्यात येते. अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेंतर्गत सरकारकडून दिवाळीसाठी मासिक अन्नधान्य व साखर साठा पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे ग्रामीणसाठी प्रति शिधापत्रिकेवर तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ आणि एक किलो साखर दिली जाणार आहे, असा एकूण सात हजार 461 मेट्रिक टन गहू, चार हजार 974 टन तांदूळ तर 530 क्विंटल साखर वितरित केली जाणार आहे. पुणे शहरासाठी चार हजार 623 मेट्रिक टन गहू, तीन हजार 82 टन तांदूळ तर 450 क्विंटल साखर वितरित केली जाणार आहे. दरम्यान, यंदा पिवळे आणि काही केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिकेवर एक किलो साखर दिली जाणार आहे. 

अन्नधान्य वितरण विभागातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने अत्यावश्‍यक कामे केली जात आहेत. जिल्ह्यातील जवळपास एक लाख 50 हजार शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य व साखर वाटप करण्यात आली आहे. 
- दिनेश भालेदार, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे जिल्हा 

Web Title: pune news ration card