दोऱ्याचा वापर करीत घोडा, हत्तीच्या भावमुद्रा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

चित्रकार साहिल परांजपे यांनी साकारलेल्या "थ्रेड आर्ट ऑन वूडन प्लॅंक' आणि "वॉटर कलर पेंटिंग्ज'च्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन परांजपे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते

पुणे - ""तरुणांनी पारंपरिक कला जोपासून त्या समृद्ध करण्याचे आव्हान स्वीकारायला हवे. याबरोबरच आपापल्या क्षेत्रात नावीन्याचा शोध घ्यायला हवा,'' असे मत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केले.

चित्रकार साहिल परांजपे यांनी साकारलेल्या "थ्रेड आर्ट ऑन वूडन प्लॅंक' आणि "वॉटर कलर पेंटिंग्ज'च्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन परांजपे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी पुष्पा परांजपे, श्रीकांत परांजपे, वर्षा परांजपे, मीनल परांजपे, राहुल परांजपे, नंदिता परांजपे, अनिकेत पराडकर, दामिनी हल्ली उपस्थित होते. दोऱ्याचा वापर करीत साकारलेला घोडा, हत्ती, वाघ आदींच्या भावमुद्रा याचबरोबर वॉटर कलरच्या माध्यमातून साकारलेली अनेकविध व्यक्तिचित्रे, पक्षी, निसर्ग यांच्या रंगछटा पाहण्याचा वेगळा अनुभव या प्रदर्शनामध्ये कलाप्रेमींनी मिळू शकेल. मॉडेल कॉलनी येथील द रवी परांजपे स्टुडिओत रविवार (ता. 20) पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 दरम्यान हे प्रदर्शन पाहता येईल. ते सर्वांसाठी विनामूल्य आहे.

Web Title: pune news; ravi paranjape paintings