सासू-सुनेच्या नात्यात मायेचा गोडवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

सासू-सून-नात, नणंद-भावजयीत संबंध होताहेत दृढ

पुणे - ‘तू नाश्‍ता केलास का गं, दहा वाजले पटकन आवरून ऑफिसला निघ, डबा भरून ठेवलाय’, असे शब्द कानावर पडले की ‘आई आणि मुलगी’ या दोघींमधील संवादाची आठवण होते. मात्र, येथे तुमचा अंदाज चुकतोय, कारण हल्ली सासू आणि सून यांच्यातील संवादातून अशी वाक्‍ये कानावर पडत आहेत. ‘आपल्या घरात एक तरी मुलगी जन्माला यावी’, असे खुद्द सासूबाईंनाच वाटत असल्यामुळे त्या मुलापेक्षा मुलीच्या जन्माचे स्वागत जल्लोषात करत आहेत. आता तर ‘सासू-सून-नात’, ‘सासू-सून’, ‘नणंद-भावजय’ हे नाते सोशल मीडियाद्वारे अधिक दृढ होताना दिसत आहे.

सासू आणि सून यांच्यातील ऋणानुबंधावरच सुखी संसाराचा मनोरा उभा असतो, याची प्रचिती अनेकदा येतेच. पण, आता ‘सासू-सून-नात’ यातील नातं अधिक दृढ होताना दिसत आहे. 

बोट क्‍लब मार्गावरील एका खासगी कंपनीत सहायक व्यवस्थापक म्हणून काम पाहणारी मेघना जोशी म्हणते, ‘‘माझ्या सासूबाईंना मुलगीच हवी होती. खरं तर इथे सासूबाई म्हणणे तितकेसे योग्य वाटत नाही; कारण त्या माझ्या आईसारख्याच आहेत. किंबहुना आमच्यातील नातं हे आई-मुलीसारखेच आहे.’’ असो, जोशी परिवारात ‘स्वरा’च्या निमित्ताने तब्बल ६० वर्षांनी मुलीचा जन्म झाला. आता स्वरा पाच वर्षांची झाली असून स्वरा, सासूबाई आणि माझ्यात एक वेगळंच ‘ट्युनिंग’ असल्याचे मेघना 
सांगते.

घरात मुलगी नसली, तर सून आणि नातीच्या रूपाने मुलीची हौस पूर्ण होत आहे. त्यातही सासू, सून आणि नात यांच्यातील नातं काही औरच... सोशल मीडियाद्वारे या नात्यातील बंध अधिक घट्ट होताना दिसतात. ‘आम्ही तिघी’, ‘त्या तिघी’, ‘सा-सू’ (सासू-सून), ‘किटी पार्टी’ अशा नावाने विविध व्हॉटस्‌ॲप ग्रुप अनेकींच्या मोबाईलवर पाहायला मिळतात. 

माझ्या सासूनेही माझ्या मुलीच्या जन्माचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले होते. आजही आमच्या तिघींचे खूप छान जमते. आमचा ‘नणंद-भावजय’, ‘सासू-सून-नणंद’ असा व्हॉटस्‌ॲप ग्रुप आहे.
- प्रियांका शहा 

माझी मुलगी श्रावणी, सासूबाई आणि मी आम्हा तिघींचे नाते काही वेगळेच आहे. आमच्या तिघींची खूप चांगली मैत्री आहे. खरं तर मला मुलगी व्हावी, यासाठी सासूबाई स्वतःच आग्रही होत्या. आमच्या तिघींचे नातेसंबंध सोशल मीडियाद्वारेदेखील जपले जात आहे.
- पूजा दौंडकर 

Web Title: pune news relation in family