तुम्ही चिखलगावला एकदा तरी या! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

पुणे - ""लोकमान्य टिळकांचे जन्मगाव असलेल्या चिखलगावात सामाजिक जाणिवेतून एक वेगळी शैक्षणिक रचना उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. कल्पक, निर्मितिक्षम विचारांच्या युवकांची आज देशाला गरज असून, त्या दृष्टीने तेथे काम चालत आहे. याला "लोकमान्यता' मिळत आहे. हे काम पाहायला तुम्ही एकदा तरी या...'' अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई दांडेकर यांनी पुणेकरांना "निमंत्रण'च दिले. 

आंतरराष्ट्रीय पालक दिनानिमित्त डीपर, सर फाउंडेशनतर्फे दिला जाणारा "महापालक सन्मान' महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते रेणूताई आणि डॉ. राजाभाऊ दांडेकर या दाम्पत्याला प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, सर फाउंडेशनचे संस्थापक हरीश बुटले, रोहिणी बुटले उपस्थित होत्या. 

राजाभाऊ दांडेकर म्हणाले, ""इतक्‍या वर्षांपासून काम करत आलो असलो, तरी आजही आम्ही विद्यार्थीच आहोत. वेगवेगळ्या व्यक्तींच्या भेटीगाठीतून आणि संवादातून सतत ऊर्जा मिळते. त्यातून सामाजिक काम पुढे चालू ठेवण्याची प्रेरणा मिळते. सामाजिक कामामुळे आम्ही सध्या शेकडो मुलांचे पालक आहोत; पण समाजाचे पालक होणे, ही खूप मोठी जबाबदारी असते, याची जाणीव आहे.'' लोकमान्य टिळकांचे विचार दांडेकर दाम्पत्याने कृतीत उतरवले, असे गौरवोद्‌गार टिळक यांनी काढले. 

शिक्षकांचा पगार वाढवणार 
""महापालिकेकडे चांगल्या शाळा आहेत. त्या शाळांत विद्यार्थी पाठविण्यासाठी पालक तयार आहेत. विद्यार्थीही येतात. प्रश्‍न एकच आहे तो म्हणजे चांगल्या शिक्षकांचा. चांगले शिक्षक मिळत नाहीत. कारण त्यांना चांगला पगार मिळत नव्हता. ही अडचण समजून घेऊन आम्ही शिक्षकांचा पगार पाच हजार रुपयांवरून बारा हजार रुपयांपर्यंत आणत आहोत,'' अशी माहिती मुक्ता टिळक यांनी या वेळी दिली. 

Web Title: pune news Renu Dandekar