बांधकाम व्यवसायामध्ये "रेरा'मुळे सकारात्मक बदल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

पुणे  - रियल इस्टेट रेग्युलेटरी ऍथॉरिटी (रेरा) येण्यामुळे बांधकाम व्यवसायात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. प्रक्रिया अत्यंत सुरळीत होत आहे. या कायद्याचा सर्वांनी अवलंब केला, तर येत्या काळात बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस पाहायला मिळतील, असे मत "रेरा' सल्लागार विनोद पिसाळ यांनी व्यक्त केले. 

असोसिएशन फॉर सिव्हिल इंजिनिअर्स डेव्हलपमेंटतर्फे (एसीईडी) आयोजित "रेरा आणि त्याचे बांधकाम क्षेत्रावरील परिणाम' या विषयावरील चर्चासत्रात पिसाळ बोलत होते. याप्रसंगी प्रकल्प सल्लागार बळवंत भिसे, इकोलाईट ब्लॉक्‍सचे उपाध्यक्ष साई ईश्वरन, संयोजन समितीचे सदस्य प्रकाश भट, निखिल शहा, मदन खांडेकर, अशोक रेतावडे, विलास भोसले, प्रवीण मुंढे, सतीश यंबल, गोविंद देशपांडे उपस्थित होते. 

विनोद पिसाळ म्हणाले, ""हा कायदा येण्याआधी ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. प्रकल्पपूर्तीसाठी लागणारा विलंब, बांधकामाचा दर्जा, बेशिस्त आर्थिक व्यवहार, कामातील दुर्लक्ष अशा समस्यांना "रेरा'मुळे आळा बसणार आहे. कामाची वेळ, दर्जा, सुरक्षितता, प्रकल्पाची किंमत, नियोजन याला अधिक महत्त्व दिले जात आहे. रेरांतर्गत प्रकल्पाची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार असून, त्याची अधिकृतता सिद्ध होणार आहे. ग्राहकांनीही "रेरा'ची माहिती करून घ्यावी, जेणेकरून घर घेताना मार्गदर्शक ठरेल. विकासकांनी रेराला घाबरून न जाता नोंदणी करून घ्यायला हवी.'' रियाज पटेल यांनी सूत्रसंचालन केले. निखिल शहा यांनी आभार मानले.

Web Title: pune news rera construction