‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

‘जीएसटी’मधून जीवनावश्‍यक वस्तू वगळण्याची व्यापाऱ्यांची मागणी

पुणे - जीवनावश्‍यक वस्तू जीएसटीमधून वगळाव्यात या मागणीसाठी दि पूना मर्चंट्‌स चेंबरने पुकारलेल्या एक दिवसाच्या लाक्षणिक बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारातील सर्व व्यापारी यात सहभागी झाले होते.

‘जीएसटी’मधून जीवनावश्‍यक वस्तू वगळण्याची व्यापाऱ्यांची मागणी

पुणे - जीवनावश्‍यक वस्तू जीएसटीमधून वगळाव्यात या मागणीसाठी दि पूना मर्चंट्‌स चेंबरने पुकारलेल्या एक दिवसाच्या लाक्षणिक बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारातील सर्व व्यापारी यात सहभागी झाले होते.

जुलै महिन्यापासून जीवनावश्‍यक वस्तूवर जीएसटी लागू केला आहे. ब्रॅंडेड आणि नॉन ब्रॅंडेड असा भेदभाव न करता सर्व प्रकारचे धान्य, कडधान्य, रवा, मैदा, आटा, बेसन आदी करमुक्त कराव्यात. त्याचप्रमाणे मूल्यवर्धित कर (व्हॅट) लागू नसलेल्या मिरची, हळद, चिंच, खजूर, मनुके, सुटा चहा हेदेखील करमुक्त करावेत, सुकामेव्यावरील जीएसटीचा दर १२ ऐवजी पाच टक्के करावा, जीएसटीमधील जाचक अटी वगळाव्यात, सुधारित परतावा (रिटर्न) दाखल करण्याची तरतूद करावी, व्यावसायिकांना कायद्याची संपूर्ण माहिती होईपर्यंत दंडात्मक कारवाई करू नये, व्यवसाय कर आणि बाजार समिती शुल्क रद्द करावे, करपात्र रकमेवर दोन टक्के सूट मिळावी, आदी  मागण्या व्यापाऱ्यांनी केल्या आहेत. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने नायब तहसीलदार शारदा खाडे यांनी स्वीकारले. चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, राजेंद्र बाठिया, जवाहरलाल बोथरा, अशोक लोढा, रायकुमार नहार उपस्थित होते.

जीएसटीच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार गुरुवारी मार्केट यार्ड आणि पिंपरी चिंचवड येथील घाऊक व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. यामुळे मार्केट यार्ड येथील आर्थिक उलाढाल थंडावली. राज्यव्यापी बंदला पंढरपूर, नातेपुते, सांगली, उस्मानाबाद आदी भागांत चांगला प्रतिसाद मिळाला. पुण्यातील घाऊक व्यापाऱ्यांनी बंद पाळून मागण्यांकडे लक्ष वेधल्याचे चोरबेले यांनी सांगितले.

Web Title: pune news response for ban